हिंगोली प्रतिनिधी | शिवसेना नेते आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या मराठवाडा दौर्यावर असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत असताना बुधवारी ठाकरे यांनी हिंगोली येथे शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कर्जमाफी कोणाकोणाला मिळाली आहे? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला. त्यावेळी ‘कर्जमाफी कोणालाच मिळालेली नाही’ असे उत्तर आले. पीकविमा योजना इथे किती लोकांना मिळाली आहे? तुमच्याकडे काही दाखले वगैरे आहेत का ? असंही ठाकरे यांनी यावेळी विचारलं.
‘सरकार कडून तुम्हाला सांगितल जातंय कि कर्जमाफी दिली आहे. मात्र बँकेत गेल्यावर तुम्हाला तिथ उभ करून घेतलं जात नाहीये. पीकविमा योजना अलीकडील काळात प्रायव्हेट कंपनींना चालवायला देण्यात आली आहे. यावर लवकर तोडगा निघाला नाही तर शिवसेना तुमच्या पाठीमागे ठाम उभी राहील आणि शिवसेना स्टाईल आंदोलन करेल’ असा इशारा ठाकरे यांनी बोलताना दिला. ‘मी गेले काही दिवस दुष्काळी भागातून फिरतो आहे. मला दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे. पण दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना कायम तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहील’ असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
तसेच ‘तुमचे आशीर्वाद घ्यायला मी आलेलो आहे. हा दौर्याचा पहिला टप्पा आहे. मी इथून पुढे येताच राहील’ असे म्हणून ‘तुम्ही कुठल्याही पक्षाचे मतदार असाल तरी शिवसेना तुम्हाला मदत करेल. पाण्याचे टेंकर असतील, जोडप्यांची लग्न असतील आम्ही तुमच्या सोबत असू’ असे ठाकरे यांनी सांगितले.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
मोदींनी देशात आणीबाणी घोषित करावी – शिवसेना
मुंबईतील या प्रमुख स्थानकांची नावे बदलणार, शिवसेनेचा प्रस्ताव