मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंच्या कामावर अभिनेत्री दिशा पटानी चांगलीच खुश! म्हणाली..

0
47
छायाचित्र सौजन्य: टाइम्स ऑफ इंडिया
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । महाराष्ट्र राज्याचे विद्यमान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यांच्यात काही चाललं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक मुलाखतींमध्ये या दोघांना याविषयी प्रश्न विचारले गेले असता आमच्यात केवळ निखळ मैत्री असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. दरम्यान, दिशा पटानीचा मलंग हा सिनेमा येऊ घातला आहे. त्या निमित्ताने ‘न्यूज १८’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिशाने पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे.

या मुलाखतीत दिशाला आदित्य ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला गेला. आदित्य ठाकरे तुमचे चांगले मित्र आहेत. ते सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे तुझ्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्या कामावर किती विश्वास आहे असा प्रश्न दिशाला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना दिशाने आदित्यच्या कामाची चांगलीच स्तुती केली.

ती म्हणाली,”आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या कामावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे. आदित्य पर्यावरण संवर्धनासाठी बरंच काही करत आहेत. खास करून जंगल वाचवण्यासाठी त्यांनी चांगले पाऊल उचलले आहे. आता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. त्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला चालना दिली आहे. आता तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकता, सिनेमा पाहू शकता. नाइट लाइफच्या संकल्पनेवर त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे.” दिशाच्या या उत्तरानंतर त्यांच्या मैत्रीबद्दल चर्चाना विराम लागणार असं वाटत नाही आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here