अकरावी सीईटीची प्रवेश नोंदणी तूर्तास बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद-  इयत्ता दहावीचा निकाल लागला असून अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सीईटीसाठी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी या बुधवार पासून सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी सीईटी नोंदणीची वेबसाईट हँग झाल्याने पालक व विद्यार्थ्यांची डोके दुःखी वाढली आहे.

सीईटीची http://cet.mh_ssc.ac.in ही वेबसाईट हँग होत आहे, प्रवेश अर्जासाठी नोंदणीसाठी २६ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. नोंदणीस पाच दिवस राहिलेले असूनही तांत्रिक अडचणींच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे शिक्षण मंडळाने काही दिवसांसाठी नोंदणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी पत्राद्वारे बुधवारी रात्री उशिरा दिली. याच दरम्यान, बारावीच्या मूल्यांकनाचे कामही सुरू झालेला असून, जुलै महिन्याच्या शेवटी निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिकाऱ्यानी सांगितली आहे.

Leave a Comment