34 केंद्रावर मिळणार आज दुसरा डोस

औरंगाबाद : महापालिकेला पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सात हजार लसी मिळाल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी शहरातील 34 केंद्रांवर नागरिकांना केवळ दुसरा डोस मिळेल तर पाच केंद्रांवर पहिल्या डोसची सुविधा आहे. पहिल्या डोससाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. पाच दिवसानंतर केवळ सात हजार लस मिळाले आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.

कोविल्डशिल्डचा पहिला डोस हा सादात नगर, कैसर कॉलनी, चेतना नगर, शहाबाजार, गणेश कॉलनी. इथे मिळणार, कोविल्डशिल्ड चा दुसरा डोस हा भीम नगर, गरम पाणी, आरेफ कॉलनी, सत्य विष्णू हॉस्पिटल हर्ष नगर, जिन्सी रेंगटिपुरा, बायजीपुरा, गांधिनगर, नेहरूनगर, हरसुल, आयएमए हॉल, जवाहर कॉलनी, पीरबाजार चिकलठाणा, नारेगाव, जुना बाजार, नक्षत्रवाडी, सिल्कमिल्क कॉलनी, सिडको एन 8, सिडको एन 11, विजय नगर, एमआयटी कॉलेज, मातोश्री मीराताई रामराव शिंदे आरोग्य केंद्र मसनतपूर, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, छावणी, औरंगपुरा, ईएसआयसी हॉस्पिटल, भवानीनगर, बन्सीलाल नगर, एन 2 समाज मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल आयप्पा मंदिराजवळ, महापालिका शाळा जिजामाता कॉलनी, पंडित दीनदयाल उपाध्याय आरोग्य केंद्र पुंडलिक नगर, गुरुकुल शाळा राजनगर या ठिकाणी कोरोना लसीचा दुसरा डोस मिळणार आहेत.

कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस क्रांती चौक, राजनगर, एमआयटी हॉस्पिटल एन 4 या तीन केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना पहिला व दुसरा डोस मि

You might also like