रेमडेसिविर औषधामुळे किडनी आणि लिव्हरवर विपरीत परिणाम; डॉ. संजीव ठाकूर

remdesivir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | आत्ताच्या करोणाच्या भयंकर परिस्थितीमध्ये सर्वत्र रेमदेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे आणि या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनाला येत आहे. काही ठिकाणचे डॉक्टरसुद्धा पेशंटला गरज नसताना रेमदेसिविर इंजेक्शन आणायला नातेवाइकांना सांगत आहेत. सध्या मार्केटमध्ये रेमदेसिविर इंजेक्शनची मूळ किंमत आणि विक्री किंमत याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात फरक आहे. तसेच रेमदेसिविर् इंजेक्शनचा अधिक मारा झाल्यास रुग्णाच्या किडनी आणि लिव्हरवरती मोठा परिणाम होऊ शकतो व ते कमकुवत बनतात. तसेच, ऑक्सिजन व्यवस्थित असल्यास 80 टक्के करोना रुग्णांना रेमदेसिविर इंजेक्शन घेण्याची गरज पडत नाही. असे सोलापूर शासकीय रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव कपूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

या पत्रकार परिषदेमध्ये महापालिका आयुक्तही उपस्थित होते. रेमदेसिविरसाठी डॉक्टरांकडून नातेवाईक चिठ्ठी लिहून घेत असून, गरज नसताना डॉक्टरही पाच ते सहा इंजेक्शन लिहून देत आहेत. यामुळे सर्वत्र इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे योग्य आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी महापालिका आयुक्तांना विचारला असता आयुक्तही त्यावर निरुत्तर झाले. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांचा अधिकाऱ्यांना यावर रोष ओढून घेतला.

शहर व ग्रामीण भागामध्ये रेमदेसिविर इंजेक्शनला प्रचंड मागणी असल्यामुळे, सध्या या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तुटवडा असल्यामुळे व मागणी जास्त असल्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार खूप जास्त प्रमाणात फोफावला आहे. औषधांचा कृत्रिम तुटवडा हा काही डॉक्टरांकडून सुनियोजित होत असल्याची अनेक उदाहरणे पत्रकारांनी पालिका आयुक्तांना दिले. यावेळी पत्रकार पुराव्यानिशी बोलत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी संबंधितावर कारवाई करण्याचे सांगितले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group