कोरोनाचा कहर सुरूच !! देशात आढळले 2 लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासात देशात नवे 2लाख 17 हजार 353 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील 24 तासात देशात 1 हजार 185 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या1,42,91,917 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 1,74,308 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर मागील 24 तासात 1,18,302 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,25,47,866 इतकी झाली आहे. तर सध्या देशात 15,69,743 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सूरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात आतापर्यंत 11,72,23,509 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.तर 15 एप्रिल रोजी 14,73,210 जणांनाचे स्वॅब तपासन्यात आले होते. याबाबतची माहिती ICMR ने दिली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment