NHAI Requirement 2024| सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. कारण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI) ने विविध रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती वाचा.
संस्थेचे नाव – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India)
एकूण पदसंख्या – 38 रिक्त जागा
रिक्त पदांची नावे- वरिष्ठ महामार्ग तज्ञ 5 जागा, मुख्य डिपीआर तज्ञ 5 जागा, रस्ते सुरक्षा तज्ञ 5 जागा, वाहतूक तज्ञ 5 जागा, पर्यावरण/वन तज्ञ 5 जागा, जमीन संपादन तज्ञ 5 जागा, भू-तंत्रज्ञ तज्ञ 5 जागा, पुल तज्ञ 2 जागा, सुरुंग तज्ञ 1 जागा,
वयोमर्यादा – कमाल वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत असायला हवे.
कामाचा कालावधी – 2 वर्षे
पगार – विविध पदांसाठी अनुभव आणि पात्रतेनुसार पगार ठरवण्यात आला आहे.
अधिकृत संकेतस्थळ – https://nhai.gov.in/
महत्वाचे म्हणजे, निवडलेल्या उमेदवारांना कराराच्या कालावधीत पूर्ण वेळ काम करावे लागेल. त्यांना कोणत्याही इतर असाइनमेंट करता येणार नाहीत. प्रवास भत्ता / महागाई भत्ता सामील होताना किंवा पूर्ण झाल्यावर दिला जाणार नाही. सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयात हजर राहणे आवश्यक असेल. दिलेल्या सूचना पाळाव्या लागतील.