हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण विमानाचे अनेक अपघात पहिले असतील. सध्या असाच एक विमानाच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सेंट्रल अमेरिकेतील देश कोस्टा रीका या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एका विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालं आणि धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानाचा अपघात होवून थेट दोन तुकडे झाले.
या विमानतळावर दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण विमानतळ बंद ठेवावं लागलं. DHL कंपनीच्या बोईंग 757-200 मालवाहू विमानाने विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केलं आणि त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर पायलट आणि सह-वैमानिकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
A DHL plane slid out of control and crashed on the runway of Juan Santa Maria Airport in Costa Rica on Thursday. pic.twitter.com/2DTl8pUaST
— CBS News (@CBSNews) April 8, 2022
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, विमान धावपट्टीवर उतरताना दिसत आहे. काही अंतर गेल्यावर त्याचा तोल बिघडल्याचा भास होतो आणि विमान आपली दिशा बदलतं. दिशा बदलताच ते फिरतं आणि त्याचा मागील भाग तुटून वेगळा होतो. डीएचएलने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.