इस्लामाबाद । इस्लामाबादमधील अफगाणिस्तानचे राजदूत नजीबुल्ला अलिखील यांच्या मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखीनच वाढला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील अफगाण राजदूत नजीबुल्ला अलिखील यांची मुलगी सिलिसिला अलीखील हिचे 17 जुलै (शनिवारी) इस्लामाबाद येथील घरी परत जाताना अपहरण केले गेले. अपहरण झाल्यानंतर तिच्यावर कित्येक तास पाशवी अत्याचार करण्यात आले, त्यानंतर अपहरणकर्त्यांनी तिला जाऊ दिले. आता तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Daughter of Afghan Ambassador in Pakistan was released after being kidnapped, says Pak Media
— ANI (@ANI) July 17, 2021
या घटनेचा निषेध करत अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सरकारला राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले गेले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “आम्ही या भयंकर गुन्ह्याचा निषेध करतो आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत पाकिस्तानी मिशनमध्ये तैनात असलेले आमचे राजनैतिक अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी करतो.”
मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की,”आम्ही हे प्रकरण पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयासमोर ठेवणार आहोत आणि चौकशीनंतर यामध्ये सामील असलेल्यांना शिक्षा करण्याची पाक सरकारकडे मागणी करणार आहोत.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा