हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आज मोठा उलटफेर पाहायला मिळायला. तुलनेनं हलक्या असलेल्या अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का (AFG Vs NZ) दिला दिला आहे. तब्बल ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवून क्रिकेट विश्वास अफगाणिस्तानने खळबळ उडवून दिली आहे. अफगाणी फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांनी नांग्या टाकल्या. विकेटकिपर फलंदाज रहमतुल्लाह गुरबाज मन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. सलामीवीर रहमतुल्लाह गुरबाजने सार्वधिक ८० धावा केल्या. गुरबाजने अवघ्या ५६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने किवी गोलंदाजांवर हल्ला केला. गुरबाज शिवाय सलामीवर इब्राहिम झाद्रनने ४४ आणि ओमरझईने २२ धावा केल्या. तर न्यूझीलंड कडून ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. याशिवाय लॉकी फर्ग्युसनला एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. पहिल्याच चेंडूवर फझल फारुकीने फिन अलेनचा त्रिफळा उडवला. डेवोन कॉन्वे सुद्धा ८ धावांवर माघारी परतला. या धक्क्यातून न्यूझीलंडचा संघ सावरलाच नाही. केन विलियम्सन, डार्लि मिचेल, ग्लेन फिलिप, चॅपमॅन, ब्रेसवेल हे फलंदाज सपशेल फेल गेले. अफगाणी फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले आणि न्यूझीलंडचा संपूर्ण डाव अवघ्या ७५ धावांवर आटोपला. राशीद खान आणि फझल फारुकीने प्रत्येकी ४ बळी घेतले तर मोहम्मद नबीने २ विकेट्स घेतल्या. या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानचे मनोबल चांगलेच उंचावलं असेल तर न्यूझीलंडला मात्र हा पराभव म्हणजे मोठा धक्का आहे.