African Swine Fever Virus | आफ्रिकन स्वाइन फिव्हर व्हायरसने घातले पुण्यात थैमान, जाणून घ्या आजाराची लक्षणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

African Swine Fever Virus | माणसांना ज्याप्रमाणे साथीचे आजार होतात. त्याचप्रमाणे आजकाल प्राण्यांना देखील या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. अशातच आफ्रिकन स्वाईन फिवर हा एक डुकरांचा अत्यंत जीवघेणा आजार आलेला आहे. हा आजार एका प्राण्यांपासून दुसऱ्या प्राण्यांना पसरतो. गेल्या महिन्यात पुण्यात देखील या आजाराचे दोन रुग्ण आढळले आहे. आणि यामुळेच आता पशुसंवर्धन विभागात चांगलेच खळबळ उडालेले दिसत आहे.

हा आजार पसरल्याने मृत्यू हा शंभर टक्के होत असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे आता हा रोग बाधित असणाऱ्या डुकरांना मारण्याचा अवलंब देखील करण्यात आलेला आहे. परंतु हा आजार नक्की काय आहे. त्याची लक्षणे कशी दिसतात याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे.

आफ्रिकन स्वाईन फिवर म्हणजे काय

युएस फूड आणि ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन यांच्या मते आफ्रिकन स्वाईन फिवर व्हायरस हा एक डुकरांचा संसर्गजन्य रोग आहे. ज्यामुळे जीव देखील जाऊ शकतो हा आजार पाळीव तसेच जंगली डुकरांमध्ये पाहायला मिळतो. आतापर्यंत मानवावर याचा जास्त काही परिणाम झालेला नाही. तरी देखील भविष्यात जाऊन हा मानवासाठी देखील धोकादायक आजार असू शकतो.

हा आजार संसर्ग जनावरांपासून दुसऱ्या जनावरांमध्ये पसरतो हा एक संसर्गजन्य श्वसन रोग आहे. तो डुकरांना प्रभावित करतो याचा मुख्य कारण म्हणजे यांचा आहे.

आफ्रिकन स्वाईन फिगर याची लक्षणे काय आहेत | African Swine Fever Virus

  • हा आजार झाल्यावर ते डुकरांना उच्च प्रमाणात ताप येतो.
  • डुकरांना क्वचितच श्वास घेता येतो
  • त्यांचा घसा खवखवतो आणि खोकला देखील येतो.
  • त्याचप्रमाणे अशक्तपणा आणि डोकेदुखी चालू होते.
  • स्नायू दुखी देखील चालू होते त्याचप्रमाणे अतिसाराने रक्तस्त्राव देखील व्हायला सुरुवात होते.