जसप्रीत बुमराहच्या 5 विकेट्सनंतर पत्नी संजनाचे ‘ते’ ट्विट व्हायरल म्हणाली ‘माझा नवरा….’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने कालच्या सामन्यात पाच वेळेस विजेते असलेल्या मुंबई इंडियन्सचा 52 रननं पराभव केला. या विजयामुळे केकेआरने ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची आशा कायम ठेवली आहे. तर मुंबई इंडियन्सचे या स्पर्धेतील आव्हान अगोदरच संपुष्टात आले आहे. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अनुभवी बॉलर जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) भेदक गोलंदाजी करत त्याने या सिझनमधील सर्वात बेस्ट स्पेल टाकला. ‘यॉर्कर’ स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या बुमराहने (Jaspreet Bumrah) पहिल्या 3 ओव्हरमध्येच 5 विकेट्स यामध्ये एक ओव्हर मेडन देखील टाकली.

बुमराहने आतापर्यंतच्या त्याच्या टी20 कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच एका मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 10 रन देत 5 विकेट्स घेतल्या. बुमराहच्या या स्पेलमुळे केकेआरच्या टीमची अवस्था 2 आऊट 123 वरून 9 आऊट 165 अशी झाली. बुमराहची बॉलिंग पाहून डीवाय पाटील स्टेडिअमवर उपस्थित असलेली त्याची पत्नी संजना गणेशन चांगलीच आनंदी झाली होती.

संजना गणेशननं तिचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आगीच्या तीन इमोजीचा वापर करत ‘माझा नवरा फायर आहे,’ असं ट्विट केले. संजनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 8 व्या ओव्हरमध्ये बुमराहने (Jaspreet Bumrah) एकही रन न देता 3 विकेट घेतल्या, याशिवाय 20 व्या ओव्हरमध्ये त्याने पहिल्या 5 बॉलला एकही रन दिली नाही, पण शेवटच्या बॉलला केकेआरने एक रन काढली. मात्र तरीदेखील मुंबईला हा सामना जिंकता आला नाही. त्यांचा या सामन्यात 52 रननं पराभव झाला आहे.

हे पण वाचा 
Gold Price : सोने महागले तर चांदी घसरली

आता तुम्ही कोणाची औलाद आहात ते सांगावे; अजित दादांवर टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली

Weight Loss Tips : कायमचं वजन कमी करायचं असेल तर ‘या’ 3 सवयी स्वत:ला लावून घ्याच…

वाघाची डरकाळी अन् भगवा झेंडा….; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टिझर पहाच…..

“… त्यापेक्षा Elon Musk यांनी भारतात गुंतवणूक करावी” – अदार पूनावाला

Leave a Comment