Sunday, March 26, 2023

इंद्राणी मुखर्जीने 10 वर्षांनंतर भर कोर्टात दिली ‘ही’ कबुली, प्रकरणात मोठा ट्विस्ट

- Advertisement -

मुबई : हॅलो महाराष्ट्र – शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने (indrani mukherjee) मुंबई सत्र न्यायालयात नवा खुलासा केला आहे. यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. आता या खुलास्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. इंद्राणी मुखर्जीच्या (indrani mukherjee) वकिलांकडून आज राहुल मुखर्जी याची उलट तपासणी घेता वेळी हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.

काय केला खुलासा?
इंद्राणीचे (indrani mukherjee) वकील अ‍ॅड रणजीत सांगळे यांनी विचारले की, शीना तुझी चुलत बहीण आहे हे माहिती झाल्यानंतरही तिच्यासोबत शारीरिक संबंध का ठेवले? या बाबत नैतिक दृष्ट्या तुला काहीच वाटलं नाही का ? यावर साक्षीदार राहुल मुखर्जीने सांगितलं की, इंद्राणी (indrani mukherjee) आणि माझे ब्लड रिलेशन नसल्यामुळे मी आणि शीना एकमेकांच्या संमतीने रिलेशनशिपमध्ये राहिलो. 2015 पासून शीना ही माझी मुलगी नसून बहीण असल्याचा इंद्राणी मुखर्जी कडून दावा केला जात होता. मात्र आज इंद्राणीने शीना ही स्वतःची मुलगी असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळणार आहे.

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी इंद्राणी मुखर्जीची (indrani mukherjee) दोन लग्न झाली आहेत. शीना ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी आहे. यानंतर इंद्राणी मुखर्जीने पीटर मुखर्जीसोबत दुसरं लग्न केले. दरम्यान शीना आणि पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीपासूनच मुलगा राहुल मुखर्जीसोबत तिचे प्रेमसंबंध सुरू होते. हे इंद्राणीला खटकत होते. याच कारणातून तिने आपली लेक शीनाची हत्या केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र अजून ते सिद्ध झालेले नाही.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!