होळीनंतर शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान सन्मान निधीचे 4,000 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर करते.

आतापर्यंत या योजनेंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने 10 हप्त्यांमध्ये पैसे पाठवले आहेत. त्याचा पुढील हप्ता एप्रिल महिन्यात येणे अपेक्षित आहे. मात्र आता नवीन नियमांनुसार ई-केवायसी करणे आवश्यक असणार आहे. तसे न केल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.

E-KYC पूर्ण करा
अशा परिस्थितीत, तुम्हाला 11व्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील, तर 31 मार्च 2022 पूर्वी E-KYC पूर्ण करा. अन्यथा, त्याशिवाय एप्रिल-जुलैचा 2000 रुपयांचा हप्ता खात्यात येणार नाही. शेतकरी स्वतःही E-KYC करू शकतात. जर मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल, तर पीएम-किसानच्या वेब पोर्टलवर जाऊन E-KYC चा पर्याय निवडावा लागेल. पोर्टलवर त्यांच्याकडून आधार क्रमांक विचारला जाईल. पोर्टलवर दिसणारा इमेज मजकूर भरल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा.

यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल. ते भरा आणि Get OTP वर क्लिक करा. शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल, जो पोर्टलवर भरला जाईल आणि सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर E-KYC ची प्रक्रिया पूर्ण होईल. जर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल, तर त्याला जन सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करून घ्यावे लागेल.

कोणाला चार हजार रुपये मिळतील
नवीन वर्षाच्या सुरुवातीसह 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांना या योजनेच्या 10 व्या हप्त्यापैकी 2000 रुपये मिळाले. आता लवकरच PM किसान योजनेअंतर्गत 11 वा हप्ता येणार आहे. अशा परिस्थितीत, योजनेच्या लाभार्थ्यांना एक विशेष संधी आहे आणि त्यांना यावेळी 4000 रुपये मिळू शकतात. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, मात्र अद्याप अर्ज करू शकलेले नाहीत, त्यांना ही संधी दिली जाईल. जर नवीन शेतकऱ्यांनी 31 मार्च 2022 पूर्वी PM किसान योजनेसाठी स्वतःची नोंदणी केली तर त्यांना दोन हप्त्यांचे पैसे मिळतील. म्हणजेच 11व्या हप्त्यासोबत दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये जोडून त्यांना एकूण 4,000 रुपये मिळू शकतात.

Leave a Comment