हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. जगभरात मोदींचे चाहते पाहायला मिळतात. मोदींच्या करिष्म्यामुळे जगातील अनेक देश भारताला महत्व देत आहेत. आताही मोदींनी आणखी एक किमया साध्य केली आहे. नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधी यांच्यानंतर न्यू यॉर्क-आधारित न्यूजवीक मासिकाच्या होमपेजवर दिसणारे दुसरे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मासिकाच्या एप्रिल 1966 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर दिसल्या होत्या. न्यूयॉर्क-आधारित मासिकाने मार्चच्या उत्तरार्धात पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली ज्यात भारत-चीन सीमा परिस्थिती, राम मंदिर, कलम 370 आणि इतरांवर लक्ष केंद्रित केले गेले.
यावेळी, चीनसोबतच्या संबंधांबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देशातील द्विपक्षीय संवाद आणखी वाढवण्यासाठी दोन्ही देशांमधील सीमा विवाद तातडीने सोडवणे आवश्यक आहे. भारतासाठी, चीनसोबतचे संबंध महत्त्वाचे आणि महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे सीमेवरील प्रदीर्घ परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून द्विपक्षीय परस्परसंवाद अजून चांगला होईल. कारण भारत आणि चीन यांच्यातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील राजनैतिक संबंध कमालीचे बिघडले आहेत. 2020 मध्ये लडाख प्रदेशातील उच्च-उंचीवरील गलवान व्हॅली चकमकीत सुमारे 20 भारतीय सैनिक मारले गेले होते.
न्यूयॉर्क-आधारित मासिकाला दिलेल्या विस्तृत मुलाखतीत मोदींनी आगामी लोकसभा निवडणुका, पाकिस्तानसोबतचे संबंध, राम मंदिर आणि लोकशाही यासह अनेक मुद्द्यांवर महत्वपूर्ण भाष्य केलं. भारताने नेहमीच दहशतवाद आणि हिंसाचाराला विरोध केला आहे. तसेच काश्मीर सारख्या प्रदेशात सुरक्षा आणि समृद्धी वाढवण्यासाठी समर्थन केले आहे असं मोदींनी म्हंटल होते. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याच्या टीकेवर पंतप्रधान मोदी म्हणाले, “पहिल्यांदाच लोकांना त्यांच्या आयुष्यात विकास, सुशासन आणि लोकांचे सक्षमीकरणची नवी आशा आहे. विशेष दर्जा रद्द झाल्यापासून लाखो पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काश्मीरमध्ये लोक शांततेचा आनंद घेत आहेत. 2023 मध्ये 21 दशलक्षाहून अधिक पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली अशी माहिती मोदींनी दिली.
दरम्यान, अयोध्येतील नव्याने उदघाटन झालेल्या राम मंदिरावर बोलताना मोदी म्हणाले की, भारताच्या राष्ट्रीय चेतनेवर श्री रामाचे नाव कोरले आहे. “त्यांच्या (भगवान राम) जीवनाने आपल्या सभ्यतेमध्ये विचार आणि मूल्यांची रूपरेषा निश्चित केली आहे. श्री राम त्यांच्या जन्मभूमीवर परतणे हा राष्ट्रासाठी एकात्मतेचा ऐतिहासिक क्षण होता. तो अनेक शतकांच्या चिकाटीचा आणि त्यागाचा कळस होता. जेव्हा मला समारंभाचा भाग होण्यास सांगितले गेले तेव्हा मला माहित होते की मी देशातील 1.4 अब्ज लोकांचे प्रतिनिधित्व करणार आहे ज्यांनी रामाच्या साक्षीसाठी शतकानुशतके धीराने वाट पाहिली आहे असं मोदी यांनी म्हंटल.