हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात ICC T20 विश्वचषक 2022 होणार आहे. एकूण 16 संघांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. मात्र या T20 विश्वचषकानंतर आतंरराष्ट्रीय स्तरावरील काही मोठे खेळाडू या फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतात. चला तर मग त्या खेळाडूं बाबत जाणून घेऊया :-
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघाने एरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली T20 World Cup वर आपले नाव कोरले होते.मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एरॉन फिंचला एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जाते. फिंचने 2011 साली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना फिंचने T20 मधील आपली सर्वोत्तम धावसंख्या 172 नोंदवली होती.
एरॉन फिंच सध्या 35 वर्षांचा आहे. T20 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या लिस्टमध्ये फिंच चौथ्या क्रमांकावर आहे. फिंचने याआधीच विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या सलामीवीराला घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषक जिंकून या फॉरमॅटला गुडबाय करण्याची ईच्छा आहे. T20 World Cup
गेल्या अनेक वर्षांपासून गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला अनेकदा जोरदार सुरुवात करून दिली. त्याची गणना ही जगातील सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये होते. न्यू साउथ वेल्सच्या या फलंदाजाने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
2021 च्या T20 World Cup मध्ये डेव्हिड वॉर्नरने चांगली कामगिरी केली होती. त्याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणूनही गौरवण्यात आले. भारतात पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या वर्षीच्या T20 विश्वचषकानंतर तो T20 क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो, जेणेकरून तो आपले पूर्ण लक्ष दीर्घ स्वरूपाच्या क्रिकेटवर केंद्रित करू शकेल.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर 23,000 हून जास्त आंतरराष्ट्रीय धावा जमा आहेत. आघाडीच्या फळीतील फलंदाज असलेल्या कोहलीला मात्र गेल्या काही वर्षांपासून अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. अशा स्थितीत आगामी T20 World Cup तील त्याच्या स्थानाबाबत क्रिकेट तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत.
2021 पर्यंत विराट कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत होता. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या लिस्टमध्ये कोहलीचा तिसरा क्रमांक लागतो. कोहलीच्या नावावर T20 मध्ये 3300 पेक्षा जास्त धावा जमा आहेत. या फॉरमॅटमध्ये कोहलीची सरासरी 50 पेक्षा जास्त राहिली आहे.T20 World Cup
विराट कोहली सध्या धावांसाठी झगडत आहे. यावेळी विराटची जागा घेण्यासाठी अनेक तरुण सज्ज झाले आहेत. कोहली T20 World Cup नंतर या फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो कारण पुढील वर्षी भारतात 50 षटकांचा विश्वचषक आहे. याशिवाय त्याचे कसोटी क्रिकेटवरील प्रेम सर्वश्रुत आहे.
शकीब अल हसन सध्या जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. बांगलादेशच्या या खेळाडूच्या नावावर T20 मध्ये 2000 धावा आणि 100 पेक्षा जास्त विकेट्स जमा आहेत. तसेच अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.
शाकिब अल हसन जगातील अनेक T20 लीगमध्ये खेळतो. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक 121 विकेट आहेत. 35 वर्षीय शाकिबला अलीकडेच बांगलादेशच्या कसोटी संघाचा कर्णधारही बनवण्यात आले आहे, त्यामुळे लाल चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो T20 World Cup नंतर टी-20 क्रिकेट खेळणे सोडू शकतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.t20worldcup.com/
हे पण वाचा :
PNB कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार Netflix, Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शन !!!
Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!
ITR भरण्याची मुदत वाढणार का?? आयकर विभागाने स्पष्ट केली भूमिका