ITR भरण्याची मुदत वाढणार का?? आयकर विभागाने स्पष्ट केली भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 31 जुलै रोजी संपणार आहे. तुम्हीही करदाता असाल तर आजच्या आज तुमचा ITR भरून घ्या. कारण आज तुम्ही ITR भरला नाही तर तर 1 ऑगस्टपासून तुम्हाला लेट फी लागेल. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्याच्या तयारीत सरकार अजिबात उत्सुक नाही. आयकर विभागाने आपली भूमिका याबाबत स्पष्ट केली आहे.

28 जुलै 2022 पर्यंत 4.09 कोटींहून अधिक लोकांनी आयटीआर दाखल केल्याचे इन्कम टॅक्स इंडियाच्या वतीने ट्विट करून सांगण्यात आले आहे. 28 जुलै रोजी 36 लाखांहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले होते. मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर दाखल केला नसेल, तर ते त्वरित करा आणि लेट फी टाळा असे आयकर विभागाने सांगितले आहे.

दंड किती बसेल-

इन्कम टॅक्स इंडियाने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की 31 जुलैपर्यंत आयटीआर फाइल करा आणि उशीरा दंड टाळा. म्हणजेच १ ऑगस्टपासून आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्यासाठी, 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर 1,000 रुपये लेट फी आकारली जाईल. तसेच 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी विलंब शुल्क 5,000 रुपये असेल. ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.