मविआ सरकारच्या तालिबानी कारभारामुळे राज्यात लोकशाहीचा मुडदा पडलाय; भाजपचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जन आशिर्वाद यात्रेतून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना आज पोलिसांनी अटक केली असल्याने यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपकडूनही हल्लाबोल करण्यात आला आहे. “महाराष्ट्राची जनता सध्या अफगाणिस्तानचा अनुभव घेत आहे. महाराष्ट्रातल्या सत्ताधारी मविआ सरकारच्या तालिबानी कारभारामुळे राज्यात लोकशाहीचा मुडदा पडला आहे,” अशा शब्दात भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनीही केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत टीका-टिप्पणी केली होती. मात्र भाजप नेत्यांकडूनही मंत्री राणेंचे समर्थन करीत महाविकास आघाडी सरकारवर पलटवार केला होता. मंत्री राणेंवर शिवसेना पक्षातील नेत्यांनी टीका केल्यानांतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना ईशारा दिला होता.

मंत्री राणेंच्या अटकेबाबत भाजपकडून ट्विटकरून ठाकरे सरकारला इशारा देण्यात आला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “आपण सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलोय अशा गैरसमजात ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. तुमची टक्केवारी, तुमची टगेगिरी आणि तुमच्या झुंडशाहीचा हिशोबही एक दिवस होईलच. काऊंट डाऊन सुरू झालाय…”

 

जन आशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत मंत्री राणेंवर अटक करण्याचे आदेश पोलिसांनी काढले. त्यानुसार राणेंनी कोर्टाने जामीन मागितला असता कोर्टानेही जामीन फेटाळल्या नंतर राणेंना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Comment