ग्रुपच्या शेअर्सवरील संकटानंतर एका तासात गौतम अदानी यांचे 73 हजार कोटी रुपयांचे झाले नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सोमवारी भारतीय शेअर बाजार सुरू झाल्याच्या एका तासामध्ये अदानी ग्रुपचे प्रमोटर आणि देशातील दुसर्‍या श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी यांना 73 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त (10 अब्ज डॉलर्स) नुकसान झाले.

ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार शुक्रवारी अदानी यांची वैयक्तिक संपत्ती 77 अब्ज डॉलर्स इतकी होती. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) चा सोमवारी अहवाल आल्यानंतर अदानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी घट झाली.

या विदेशी फंडाचे 43500 कोटींचे शेअर्स आहेत
इकॉनॉमिक टाइमच्या अहवालानुसार NSDL ने तीन परदेशी फंडची खाती गोठविली आहेत. या चारही कंपन्यांचे अदानी ग्रुप मध्ये 43500 कोटींचे शेअर्स आहेत. आता हे फंड हे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकत नाहीत. ही बातमी आल्यानंतर अदानीच्या कंपन्या लोअर सर्किट्सवर आल्या.

अदानीच्या कंपन्यांचे बहुतेक शेअर्स प्रमोटर्सकडे आहेत
अदानी ग्रुप सध्या जगातील सर्वात वेगवान संपत्ती निर्माता होता. सोमवारी अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 15 अब्ज डॉलर्सची विक्री झाली. अदानी ग्रुप च्या बहुतांश लिस्टेड कंपन्यांचा प्रमोटर्सकडे जवळपास 75 टक्के हिस्सा आहे. उर्वरित फ्रीफ्लोट शेअर्सपैकी बहुतेक शेअर्स 6-7 विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या हाती आहेत.

डे टू डे ट्रेडर किंवा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी फारच कमी शेअर्स शिल्लक आहे, जे बाजारात आर्टिफिशियल डिमांड क्रिएट करतात. कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे कारणही तज्ज्ञ मानतात.

NSDL ने खाती गोठवलेल्या तिन्ही फंडांचा Adani Enterprises मध्ये 6.82 टक्के, Adani Transmission मध्ये 8.03 टक्के, Adani Total Gas मध्ये 5.92 टक्के आणि Adani Green 3.58 टक्के हिस्सा आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत बेनिफिशियल ऑनरशिप ची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. परंतु या परकीय फंडांनी बेनिफिशियल ऑनरशिपची संपूर्ण माहिती दिली गेली नाही. यामुळे त्यांची खाती गोठविली गेली आहेत.

खाती गोठवण्याचा अर्थ काय?
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सहसा कस्टोडियन आपल्या ग्राहकांना अशा कारवाईबद्दल चेतावणी देतात, परंतु जर फंडस् यास प्रतिसाद देत नसतील किंवा त्याचे पालन करत नसतील तर खाती गोठविली जाऊ शकतात. खाती गोठवण्याचा अर्थ असा आहे की, आता फंडस् कोणत्याही विद्यमान सिक्युरिटीज विकू शकत नाही किंवा नवीन खरेदी करू शकत नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment