हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनानंतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच स्थरातील मान्यवरांकडून आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला असून ” शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मोदी यांनी म्हंटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी मोदी यांनी ट्विट करीत शोक व्यक्त केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मला शब्दातीत दुःख झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडल्याबद्दल त्यांचे आपण सदैव ऋणी राहू.त्यांनी केलेले इतर कार्य ही स्मरणात राहील.”
मला शब्दातीत दुःख झाले आहे.बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडल्याबद्दल त्यांचे आपण सदैव ऋणी राहू.त्यांनी केलेले इतर कार्य ही स्मरणात राहील pic.twitter.com/B6GeqH1Shk
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
बाबासाहेब पुरंदरे हे विनोदबुद्धी, विद्वत्ता आणि भारतीय इतिहासाचे समृध्द भांडार होते. अनेकदा त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याचा सन्मान मला मिळाला. त्यांच्या शतक महोत्सवी वर्ष कार्यक्रमात त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला होता. बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या व्यापक कार्यामुळे सदैव आपल्यात जिवंत राहतील. या दुःखद प्रसंगी मी त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असे ट्विट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे.