व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चंद्रयान 3 च्या यशानंतर इस्रोची नजर सूर्यावर; लवकरच लाँच करणार ‘आदित्य एल-1’ मिशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सर्वच भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. अखेर इस्त्रोचे चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे. विशेष म्हणजे, चंद्रयान 3 मोहित यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोकडून ‘आदित्य एल-1′ लॉन्च करण्यात येणार आहे. या आदित्य एल-1’ च्या माध्यमातुन सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. येत्या, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत ही मोहीम लॉन्च केली जाईल. ही मोहीम देखील चंद्रयान 3 इतकीच महत्त्वाची असणार आहे.

ISRO ने हाती घेतलेली आदित्य एल-1 मोहीम सर्वात गुंतागुंतीची असेल. या मोहिमअंतर्गत यानाला पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या लॅरेंजियन पॉईंटवर आदित्य ठेवण्यात येईल. लॅरेंजियन पॉईंट अंतराळातील पार्किंगची जागा आहे. या भागात अगोदरपासूनच काही उपग्रह तैनाब आहेत. याठिकाणी राहून आदित्य एल 1 सूर्याचा अभ्यास करेल. या मोहिमेअंतर्गत पहिल्यांदाच सूर्यमालेत स्पेस ऑब्जर्वेटरी तैनात केले जाईल.

मुख्य म्हणजे, लॅरेंजियन पॉईंटवर राहून आदित्य यान 24 तास सूर्यावर लक्ष ठेवेल. या मोहिमेमुळे अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कणांचा प्रसार अशा सर्व गोष्टींचा अभ्यास केला जाईल. तसेच, पेलोडचा सूट कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअरची हालचाल या मोहिमेंतर्गत समजून घेता येईल. अशा अनेक कारणांसाठी आदित्य मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. ही मोहीम जरी यशस्वी ठरली तर आपल्याला सूर्याविषयी खोल संशोधन करता येईल.

दरम्यान, चांद्रयान-3 च्या यशामुळे भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलेला पहिला देश ठरला आहे. चंद्रावर पोहचलेले विक्रम लँडर चंद्रावरील पाणी, माती, वातावरणासोबत खनिज या संदर्भातील माहिती गोळा करून संशोधकांना पाठवेल. या मोहिमेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोहाचे किती प्रमाण आहे हे शोधता येईल.