लग्नानंतर नव दाम्पत्याने काढली पाण्याच्या टँकरवरुन वरात; हनिमूनला न जाता असं का केलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये सध्या प्रचंड पाऊस पडत असला तरी काही भागांमध्ये अद्यापही पाऊस पोहोचलेला नाही. राज्यातील अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाईची (Water scarcity) समस्या आहे. या पाणीटंचाईला अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. या पाणीटंचाईच्या (Water scarcity) समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावं म्हणून नागरिकांकडून आंदोलने केली जातात. पण कोल्हापुरातील एका नव दाम्पत्याने अनोख्या पद्धीने प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या दाम्पत्याने अतिशय अनोख्या पद्धतीने निदर्शने देत पाणीटंचाईच्या (Water scarcity) प्रश्नावर भाष्य केलं आहे.

जोपर्यंत घराच्या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही, अशी शपथ घेत कोल्हापुरात नवदाम्पत्याने आज चक्क पाण्याच्या टँकरवरून वरात काढली. त्यांची ही वरात चर्चेचा विषय ठरली. विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे असे या नवं दाम्पत्याची नावे आहेत. त्यांनी अभिनव पद्धतीनं ही वरात काढत पाणीटंचाईवर (Water scarcity) प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे.

‘बायकोला त्रास नको म्हणून थेट हुंडा म्हणून टँकरच घेतल्याचा’ लक्षवेधी फलक या वरातीमध्ये लावण्यात आला होता. हलगी घुमक्याच्या तालात मंगळवार पेठेतून ही वरात काढण्यात आली होती. या अनोख्या लग्नाच्या वरातीचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. आपल्या गल्लीत पाण्याची समस्या (Water scarcity) आहे. ही समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी नवं दाम्पत्याने हि शक्कल लढवली आहे.

हे पण वाचा :
IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या

आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!

Leave a Comment