हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगावमध्ये प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रोजेक्ट अचानक गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण अजूनही गरम आहे. त्यातच आता फोने पे कंपनीनंही आपलं ऑफिस मुंबईतून कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.
फोनपे कंपनीनं एक पत्रक जारी करत आपलं ऑफिस मुंबईतून शेजारच्या कर्नाटक राज्यात हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. त्याचा प्रस्ताव आता केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्याता आला असून केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर फोनपेचं मुख्य कार्यालय मुंबईतून कर्नाटकात शिफ्ट केलं जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
#PhonePe Debited from Maharastra, credited to Karnataka.
वेदांतानंतर #PhonePe ची बारी
गब्बर होतायेत शेजारी
महाराष्ट्र पडतोय आजारी
व्वा रे 🤔 सत्ताधारी!!!टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक #PAY
महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा #WAY! pic.twitter.com/RTrgLzCOTj— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 22, 2022
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. वेदांतानंतर फोनपे ची बारी, गब्बर होतायेत शेजारी… महाराष्ट्र पडतोय आजारी… व्वा रे ???? सत्ताधारी!!! टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक #PAY महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा #WAY! अशा शब्दात रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.