हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने बाजी मारली असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. 19 जागेंसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर निशाण साधला
महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. आज राज्याला मुख्यमंत्री नाही, राज्य अधोगतीकडे चालले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील जनतेला सुखाचे दिवस आणण्यासाठी आम्हाला राज्यात भाजपचे सरकार पाहिजे त्यामुळे आता आगामी लक्ष्य हे महाराष्ट्र आहे असे नारायण राणे यांनी म्हंटल
जिल्हा बँक निवडणुकीत तिनी पक्ष एकत्र येतात, राज्याचे अर्थमंत्री येतात आणि पक्षाचा पराभव करून जातात यालाच अक्कल म्हणतात असे म्हणत नारायण राणे यांनी अजित पवारांचा समाचार घेतला तर ज्याला ३६ मते मिळवता आली नाहीत तो विधानसभेची भाषा करतो असे म्हणत त्यांनी सतीश सावंत याना फटकारले