औरंगाबाद | फेसबुकवर वयक्तिक आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण तालुक्यातील युवक तालुका अध्यक्षाने एस. टी. बस समोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नेवासा-नगर महामार्गावरील वाघाडी गावाजवळ घडली. या घटनेमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महेश पाटील शिंदे (रा.आमरापूर वाघूडी, ता.पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या छावाच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
या दुर्दैवी घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून महेश हा तणावात होता. मात्र कोणत्या कारणाने तो तणावात होता हे त्याने कुणालाही सांगितले नाही. मंगळवारी ससंध्याकाली 6 वाजेच्या सुमारास त्याने फेसबुकवर आयुष्यात खूप त्रास आहे. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका अशी पोस्ट टाकली. टाकली व त्या नंतर काही वेळातच त्याने अहेमदनगर-नेवासा मार्गावरील वाघाडी गावाजवळ दुचाकी बाजूला उभी करून भरधाव जाणाऱ्या एस.टी. बस समोर उडी घेत आत्महत्या केली. महेशला नागरिकांनी तातडीने जबळील नेवासा येथील शासकीय रुग्णालयात हलविले मात्र गंभीरपणे जखमी झाल्याने व अति रक्त स्त्राव झाल्याने तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी महेशला मृत घोषित केले. आज सकाळी पैठण जवळील मूळ गावात महेशवर अंतिम संस्कार करण्यात आले.
पोस्ट नंतर अनेकांनी कॉल, कमेंटच्या माध्यमातून केली विनवणी
संध्याकाळी जेंव्हा महेश ने फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकली ती पोस्ट पाहून त्याच्या मित्र,जवळील नातेवाईक अशे अनेकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानेआत्महत्येपूर्वी मोबाईल बंद करून ठेवला होता. अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करून टोकाचे पाऊल उचलू नकोस अशी विनवणी केली मात्र तोपर्यंत त्याने बस समोर उडी घेतली होती.