परभणी | कोरोनाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून स्पेशलच्या नावाखाली प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा आकारण्यात येणारे प्रवाशी भाडे तात्काळ रद्द करून जुन्या पद्धतीने भाडे न आकारल्यास दमरेच्या कार्यलयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने दिला आहे.
याबाबत एक निवेदन दमरेला देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, कोरोना महामारीचा सुरुवातीला परिणामकारक औषधी किंवा लस नसल्याने मागील दीड वर्षापासून भारतीय रेल्वे विभागाने कोरोना पसरू नये म्हणून भारतभर सर्व गाड्यांना रद्द केले. त्यामुळे जनतेला अनंंत अडचणी निर्माण होताना देखील मान्य केले. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली परत एकदा गाड्यांना बंद करण्यात आले ते ही देखील जनतेने मूक सम्मतीने मंजुरी दिली. मात्र आता देशभरात सुमारे 60 करोड जनतेने डोस घेतली आहे आणि दररोज लाखोंच्या संख्येने लस घेतही आहेत. सोबत बहुसंख्य लोकांनी मास्क देखील वापरत असताना देखील कोरोनाचा बहाणा पुढे करून गरीब, सर्व सामान्य प्रवाशांच्या एकमेव प्रवासी साधन असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्यांपासून बेदखल करण्याचे काम दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागातील अधिकारी करीत आहेत.
मागील दीड वर्षापासून रेल्वे विभागाने कोरोना महामारीचा संकटकाळी सर्व सामान्य प्रवाशांची एकीकडे सर्व सुविधा काढून घेताना दुसरीकडे सर्व रेल्वे गाड्यांना विशेष रेल्वेचा नावाखाली दुप्पट किराया लावून सर्व सामान्य प्रवाशांना लूटणे चालू आहे. कोरोनाचा संकटकाळी आधीच संकटात सापडलेल्या गरीब, सर्वसामान्यांना लूटणे थांबा आणि लॉकडाउन पूर्वीचे किराया निर्धारित करून कमी करण्यात यावेत अन्यथा दमरेचा नांदेड येथील विभागीय कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा.सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ.राजगोपाल कालानी, रवींद्र मूथा, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, कादरीलाला हाशमी आणि दयानंद दीक्षित, वसंत लंगोटे, बाळासाहेब देशमुख इत्यादीनी दिला आहे.