इंग्रजी शाळा संघटनेच्या वतीने आंदोलन; विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्तांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बऱ्याच वेळा राज्यातील विविध शाळेच्या संघटनांनी आंदोलन करून देखील इंग्रजी शाळांच्या मागण्या प्रलंबित आहे. त्यामुळे मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या शिष्टमंडळाने ‘म्हसनात नेऊ नका’ या नाटकातील यमदूत आणि इतर पात्रांची रंग व वेशभूषा करून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर निवेदन देण्यात आले.

राज्यात एकाच वेळी विविध व इंग्रजी शाळा संघटनेच्यावतीने नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर या विभागीय स्तरावर आंदोलन सुरू आहे. लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी ही वेशभूषा आणि रंगरंगोटी केल्याचे दिसत आहे. शासनाने इंग्रजी शाळांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सर्व इंग्रजी शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा मेसा, मेस्को, इसा, मेष्टा (एफ) इंग्लिश मीडियम स्कूल संघटना, आरटीई फाउंडेशन यांनी दिला आहे.

आरटीई प्रतिपूर्तीची थकित रक्कम मिळावी, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पालकांनी शाळेची फीस भरणा करण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रके निर्गमित करावे, विना टी.सी प्रवेश परिपत्रक रद्द करणे, शाळा इमारतीस लाईट बिल व मालमत्ता करात 50 टक्के सवलत देऊन करोना काळातील 100% फीस माफ करणे, स्कूलबस टॅक्स रद्द करणे, सवलत देऊनही वर्षभर फीस न भरणाऱ्या पालकांच्या पाल्याचा प्रवेश रद्द करून शाळांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत शासनाने अध्यादेश काढावा, शाळेसोबत संबंध नसलेल्या व्यक्तींना शाळेत प्रवेश बंदी करून संरक्षण कायदा करणे, आरटीई प्रतिपूर्तीसाठी रक्कम शाळेच्या फीस प्रमाणे कायद्यानुसार वर्षातून दोन टप्प्यात विनाअट मिळावी, आरटीई अंतर्गत नर्सरी ते इयत्ता बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावे. यासह बारा मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रल्हाद शिंदे हस्तेकर, सरचिटणीस प्रवीण आव्हाळे, उपाध्यक्ष नागेश जोशी, हनुमान भोंडवे, जिल्हाध्यक्ष रत्नाकर फाळके, जिल्हा सचिव विश्वासराव दाभाडे, राजेश लिंबेकर, शहराध्यक्ष सुनील मगर, सचिन पवार, संतोष सोनवणे, महिला प्रमुख मोनाली महालपुरे, सुरेखा माने आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment