संजय राऊत म्हणतात उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावं; आता पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी देखील संजय राऊतांच्या सुरात सूर मिसळत उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविला.

महाराष्ट्रातील पूरस्थितीवर भाष्य करताना पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी याबाबत विचारले असता पवार म्हणाले, आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आनंदच आहे”.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-

उद्धव ठाकरेंकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल. राष्ट्रालाही उद्धव ठाकरेंसारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. उद्धव ठाकरे एक दिवस देशाला नेतृत्व देतील . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे असे राऊत म्हणाले.

You might also like