रिपाइंच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

टी.व्ही. सेंटरचौकात निदर्शने

औरंगाबाद । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदीला विरोध करत जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी हडको येथील टीव्ही सेंटर चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

मागील‌ वर्षभरापासून कोरोनाच्या नावाखाली देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे झालेले दुष्परिणाम अजूनही आपल्या सर्वांच्या समोर आहेत. अशातच जिल्ह्यात अजून लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गोरगरीब लोकांवर नक्कीच उपासमारीची वेळ येणार असून यांच्या तथाकथित कोरोनापेक्षा उपासमारीने शेकडो लोकांचा बळी जाणार आहे. या लॉकडाऊन आणि संचारबंदीला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आणि विविध पक्ष संघटनांचा विरोध असून आज सकाळी टी.व्ही. सेंटर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्ह्यात लॉकडाऊन व संचार बंदीला विरोध करत जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने आंदोलन स्थळीच पोलीस प्रशासनाने मागण्याचे निवेदन स्वीकारले.

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींचा ही शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यास विरोध आहे. अगोदरच कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जनसामान्यांच्या हितासाठी विविध पक्ष संघटनांच्या वतीने जिल्ह्यातील लॉकडाऊन आणि संचारबंदीला विरोध केला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like