आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले आहे की नाही घरबसल्या ‘या’ 5 स्टेपद्वारे चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पॅन कार्डला आधारशी लिंक (Pan-Aadhaar Link) करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. आपण ते लिंक न केल्यास आपला पॅन इनऍक्टिव्ह होईल. या व्यतिरिक्त तुम्हाला 10 हजार रुपये दंड देखील भरावा लागू शकतो. आपला पॅन आधारशी लिंक केलेला आहे की नाही हे तुम्ही कसे तपासू शकता ते जाणून घ्या सांगू-

(1) सर्व प्रथम, आपण प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा. तिथे डाव्या बाजूला आपल्याला क्विक लिंक नावाचा टॅब मिळेल. यामध्ये तुम्हाला लिंक आधारचा पर्याय मिळेल. यानंतर, आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

(2) या पेजच्या सर्वांत वरती क्लिक हियर असे लिहिलेले दिसेल. याव्यतिरिक्त, आपण आधीपासूनच अर्ज केला असेल तर स्टेटस चेक वर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर दुसरे पेज उघडेल. यामध्ये तुम्हाला आधार आणि पॅनकार्डची माहिती द्यावी लागेल. यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस वर क्लिक करावे लागेल. जिथे आपला आधार पॅन कार्डशी लिंक केलेला आहे की नाही हे आपल्याला समजेल.

(3) आपणास आपल्या पॅन आधारचे स्टेटस एसएमएसद्वारे देखील माहित होऊ शकते. यासाठी तुम्हाला 567678 किंवा 56161 या दोन नंबरपैकी एकावर SMS पाठवावा लागेल. आपल्याला UIDPAN 12 अंकी आधार क्रमांक 10 अंकी पॅन क्रमांक लिहून SMS पाठवावा लागेल.

(4) समजा तुमचा आधार क्रमांक 123456789123 आहे आणि पॅन कार्ड क्रमांक ABCDE1234F आहे. तर आपण UIDAPAN 123456789123 ABCDE1234F लिहून SMS करा. प्रत्युत्तरादाखल तुम्हाला स्टेटस कळेल.

(5) जर तुम्ही तुमचे इनकम टॅक्स रिटर्न भरले असेल पण पॅनबरोबर आधार कार्ड लिंक केलेला नसेल तर तुमच्या टॅक्स रिटर्नवर प्रक्रिया केली जाणार नाही. रिटर्नवर प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला आधार पॅन लिंक करावा लागेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment