आग्रा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणी पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या पत्नीला खांबाल बांधून ठेवून तिला काठीने अमानुषपणे मारहाण (husband brutally beats wife) केली आहे. यानंतर पतीने केलेल्या मारहाणीला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या आरोपी पतीने भर चौकात तिला मारहाण (husband brutally beats wife) केली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल होताच आरोपीने घटनास्थवरून पळ काढला आहे.
#WATCH उत्तर प्रदेश: आगरा में एक पति ने अपनी पत्नी को खंबे से बांधकर डंडे से पीटा। घटना का वीडियो वायरल हुआ। (20.07) pic.twitter.com/ND9CbIo9dP
— ANI_HindiNews (@AHindinews) July 20, 2022
ही घटना पोलीस स्टेशन सिकंदरा परिसरातील आरसेना गावामध्ये घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती श्याम बिहारी आणि महिलेची सासू बर्फा देवी यांच्याविरुद्ध गुन्हा (husband brutally beats wife) दाखल केला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आग्रा येथील रहिवासी असलेल्या कुसुमा देवी यांचा विवाह 17 वर्षांपूर्वीच अर्सेना गावातील रहिवासी श्याम बिहारीसोबत झाला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार पती ती खूप मद्यपान करतो. तिने विरोध केल्यावर तो तिला मारहाण (husband brutally beats wife) करतो.
या आरोपी पतीने 13 जुलै रोजी सुद्धा पीडित महिलेला मारहाण केली. याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर पत्नी घरी परतल्यावर आरोपीने क्रूरतेचा कळस गाठत कुसुमाला खांबाला बांधून काठीने अमानुषपणे मारहाण (husband brutally beats wife) केली. यादरम्यान आरोपी पती मारहाण करत असताना कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सीओ हरिपर्वत यांनी दिले आहे.
हे पण वाचा :
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय
हा तर ‘मविआ’च्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय; ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया
मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक
हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय; कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया