कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाची सध्या व्यापाऱ्यांकडून काटेमारी केली जात असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. तर एफआरपीचा प्रश्न आहे. याबाबत आज राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी काटेमारी करणाऱ्या व्यापारी व एफआरपी न देणारये कारखाने यांना इशारा दिला. “शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्यांच्या मालाची काटेमारी करणाऱ्या आणि एफआरपी थकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असून तशा प्रकारचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री भुसे यांनी आज दिली.
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आज सातारा दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज जिल्ह्यातील म्हसवे, किन्हई, कोरेगाव येथील शेती परिसराची पाहणी करीत शेतकऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, “राज्यातील शेतकरी कष्टाने आपले पीक पिकवतो. मात्र, काही व्यापारी काटेमारीतून त्याची फसवणूक करत आहे. असे प्रकार वारंवार घडत असून त्यात दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी देखील कारखान्यांनी थकवली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्याच्या मालाची काटेमारी करू नये.
किनही (जि.सातारा) येथे नावीन्यपूर्ण संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या #मत्स्यशेती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. @AUThackeray#सातारादौरा pic.twitter.com/r0qTd5aEW5
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) September 26, 2021
काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच ज्या कारखान्यांनी अद्याप एफआरपी रक्कम दिलेली नाही अशांवर कठोर स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेशही दिले असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.