अमरावती उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी घुसविल्या थेट बैलजोड्या

शेती वहीवाटीच्या पांदण रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करा. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी अमरावती उपविभागीय कार्यालयात थेट बैलजोड्या घुसविल्या. यावेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले दिसत होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकऱ्यांनी या बैलजोड्या कार्यालयाबाहेर काढल्या.

कडकनाथ घोटाळा प्रकरण; रॅली धडकणार मंत्रालयावर

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याप्रकरणी गुंतवणूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी बेळगाव येथून मोटारसायकल रॅली मोर्चा काढण्यात आला आहे. कोल्हापूर-सातारा-पुणे मार्गे हा मोर्चा शुक्रवार, दि. 13 रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. 

कांद्याचे भाव तब्बल ५ हजारांनी घसरले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला २० हजार रुपये देण्याची विक्रमी घोषणा केल्यानंतर शनिवारी जवळपास ५०० ते ७०० ट्रक कांदा बाजार समितीत दाखल झाला. मात्र हा कांदा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने कांद्याचा दर सरासरी ५ हजाराने कोसळला आहे. साठवणूक केलेला कांदा व्यापारी पुन्हा बाजारात आणत असल्याने आवक वाढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज सरासरी कांदा ३ हजार ते १० हजार प्रति क्विंटल दराने गेला आहे.

शेतकऱ्याने शासनाला परत केला नुकसान भरपाईचा धनादेश

मूल तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्यामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. जमिनीचीही खरड झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यातच शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन मदत दिली. मात्र ही मदत अत्यंत अल्प असल्यामुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याने शासनाने दिलेला धनादेश शासनालाच परत पाठवून आपला निषेध व्यक्त केला आहे. तसं निवेदनही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना उपविभागिय अधिकारी यांच्यामार्फत पाठविल आहे.

देशातील सर्वात महाग कांदा सोलापुरमध्ये !

सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यातील नव्हे तर चक्क देशातील सर्वात उच्चांकी दर कांद्याला मिळाला आहे. सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याला चक्क २०,००० हजार रूपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. प्रति क्विंटल ला इतका दर मिळाल्यामुळे सर्वांच्या नजरा सध्या कृषी सोलापूरकडे वळल्या आहेत. कांद्याला मिळालेला आजवरचा हा विक्रमी दर आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी पोलिस अधिकाऱ्याचा पुढाकार, १ महिन्याचा पगार पाठवून उचलला खारीचा वाटा

पावसाळ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला. यामध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला सुद्धा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केला असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

राजू शेट्टींनी व्यक्त केली राज्याचे कृषीमंत्री होण्याची इच्छा, मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळेल का?

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. केवळ ४ दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात ठाकरे सरकारच असणार हे निश्चित झाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सह पक्षांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत.

कांद्याचे भाव गगनाला; कांदा १३ हजार प्रति किंटल पार

गेल्या दोन महिन्यांपासून आवक मंदावल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव इथं सोमवारी कांद्याला १३ हजार रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुन्हा संकट? राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे,हवामान विभागाने वर्तवली शक्यता

संपूर्ण देशभरात उशिरा पर्यंत राहिलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. तसेच अवकाळी पावसामुळे देखील मोठे थैमान घातले. याचा मोठा परिणाम राज्यामध्ये झाला. सध्या पाऊस संपून थंडीचे आगमन होत आहे. देशभरातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीचे वेध लागले आहे. मात्र बळीराजाच्या चिंतेत भर टाकणारी शक्यता हवामान विभागाने सध्या वर्तवली आहे.

बँक खात्यांचा होल्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा स्टेट बँकेत ठिय्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वर्धा जिल्ह्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कित्येक शेतकऱ्यांकडे पिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील बॅक खात्याला बॅंकेकडून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांचे व्यवाहर ठप्प झाले आहेत. यासंबंधी‌ २८ नोव्हेंबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे होल्ड काढण्याची मागणीही केली होती.