दुर्देवी : बनवडीत ऊसाच्या पाचोळ्याच्या आगीत 11 महिन्याच्या चिमकुलीचा भाजून मृत्यू

कराड |  ऊसाच्या फडात पाचोळ्याला आग लागल्यामुळे झोळीत झोपवलेल्या अकरा महिन्याच्या मुलीचा भाजुन दुर्दैवी मृत्यू झाला. बनवडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. नंदिनी सोमय्या वरवी (रा. निलपाणी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे भाजून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊसतोड मजुरांची टोळी बनवडी गावात दाखल झाली आहे. … Read more

पगारवाढ : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना 12 टक्के

सातारा | राज्य स्तरावर शासन नियुक्त त्रिपक्षीय समितीने शिफारस केल्यानूसार अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील कायम, हंगामी कायम व वेतनश्रेणी पगार घेत असलेल्या सर्व कामगार- कर्मचाऱ्यांना सध्याच्या वेतनावर 12 टक्के वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. पगारवाढीमुळे कामगारांना प्रत्येकी सुमारे 4 हजार रुपये प्रमाणे पगार वाढ झाली असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले … Read more

साखर कारखान्याच्या अध्यक्षाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण (Video)

पंढरपूर | करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली‌ आहे. या घटनेचा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे मागील हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे सहा कोटी रुपयांची एफ आर पी ची रक्कम थकीत … Read more

कराड बाजारभाव : शेवगा तेजीत, टोमॅटोचा दर उतारला

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत शेवगा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 11 रोजी शेवग्याची आवक 10 पोती झाली असून 10 किलोचा दर 1500 ते 1700 रूपये होता. तर टोमॅटोचा दर 130 कॅरेट आवक असून 350 ते 400 रूपये 10 किलोचा दर होता. गगनाला भिडलेला टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात आजही तसाच … Read more

शेतकरी अडचणीत : महाबळेश्वर, जावळीत पावसाच्या माऱ्याने स्ट्राॅबेरी शेताच्या बांधावर फेकली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. या पावसाच्या माऱ्यामुळे सडलेली आणि नरम पडलेली स्ट्रॉबेरी अक्षरशः बांधावर फेकून द्यावी लागली आहे. महाबळेश्वरच्या शिवारात सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन चालू आहे, मात्र अवकाळीच्या तडाख्याने स्ट्राॅबेरी फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आलेली आहे. महाबळेश्वरच्या शिवारात फिरताना सध्या स्ट्रॉबेरीचा खच पडलेला … Read more

खटावचे तहसिलदार किरण जमदाडे शेतकऱ्यांच्या बांधावर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके तडवळे ता. खटाव येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पिकाची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तहसिलदारांच्या या कामाच्या पध्दतीमुळे शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या चार दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात अवकाळीने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे खटाव तालुक्यातील हाताशी … Read more

प्राज’च्या बायोसिरप तंत्रज्ञानाचे जयवंत शुगर्सवर ग्लोबल लॉन्चिंग उत्साहात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती पुणे येथील प्राज इंडस्ट्रीजने केली आहे. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच बनलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचे ग्लोबल लॉन्चिंग धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सच्या कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश … Read more

कराड बाजारभाव : टोमॅटो, भेंडी स्थिर तर ढब्बू मिरची, घेवडा तेजीत

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो व भेंडीचा दर स्थिर असून ढब्बू मिरची आणि घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत सोमवारी दि. 6 रोजी ढब्बू मिरचीची आवक 100 पोती झाली असून 10 किलोचा दर 500 ते 550 रूपये होता. तर घेवडा 30 पोती आवक असून 400 ते 450 रूपये 10 किलोचा दर … Read more

कराड बाजारभाव : टोमॅटो, भेंडी व शेवगा तेजीत

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो, भेंडी व शेवग्याला चांगला दर मिळाला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 4 रोजी टोमॅटोची आवक 235 कॅरेट झाली असून 10 किलोचा दर 400 ते 500 रूपये होता. तर भेंडी 70 पोती आवक असून दर तेजीत असला तरी 500 ते 600 रूपये 10 किलोचा दर होता. तर … Read more

पशुसंवर्धन योजना : आजपासून सुशिक्षित बेरोजगार, शेतकऱ्यांनो करा इथे अर्ज

सातारा | पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दि. 4 डिसेंबर ते दि. 18 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध … Read more