डॉ. तुकाराम खुस्पे यांचे निधनाने कृषी क्षेत्रात पोकळी : आ. पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. तुकाराम खुस्पे (वय- 87) यांचे निधनाने महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिल्ली येथील नामांकित अशा पुसा इन्स्टिट्यूट मधून त्यांनी पीएचडी प्राप्त केली होती. डाॅ. खुस्पे यांच्या जाण्याने केवळ कुटुंबाचे नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार गमावल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रध्दाजंली  वाहिली.

कराड येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते. यावेळी डाॅ. खुस्पे यांच्या पाश्चात कोटा अकॅडमीचे विश्वस्त, जेष्ठ चिरंजीव डॉ. महेश खुस्पे, सुष्ना मंजिरी खुस्पे यांचे सांत्वन करून आस्थापूर्वक विचारपूस केली. यावेळेस नगरसेवक इंद्रजित गुजर, इंद्रजित चव्हाण व गजानन आवळकर उपस्थित होते .

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, डॉ. तुकाराम खुस्पे सरांनी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावी खटाव तालुक्यातील निढळ येथे इंडो जर्मन वॉटर शेडच्या माध्यमातून जलसंधारणाचे खूप मोठे काम केले आहे. भारत सरकारच्यावतीने ते अमेरिकेत कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून युएसएआयडीच्या माध्यमातून गेले होते. तंत्रज्ञान बदलाचा मोठा कार्यक्रम राबवला होता . स्वामिनाथन कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बाजवली होती. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके कृषी क्षेत्रात अभ्यासक्रमात वापरली जातात.

Leave a Comment