Video : रयत कारखान्याचा ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पसरणी (ता. वाई) येथील भैरवनाथनगर येथे ऊसाची वाहतूक करणारा ट्रक पाण्याने भरलेल्या कालव्यात कोसळला. ही घटना सायंकाळी 6 च्या सुमारास ही घडली. ट्रकचालकाने वेळीच ट्रकमधून उडी घेतली. त्यामुळे जिवितहानी टळली, मात्र ट्रक कालव्यात कोसळल्याने पाणी तुंबून लाखो लिटर पाणी कालव्यातून बाहेर जावून वाया गेले. धोम पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्यातील पाणीपुरवठा बंद केला.

पाहता पाहता ऊसाचा ट्रक पाण्यानी गच्च भरलेल्या कॅनोलमध्ये कोसळला; त्यानंतर..

य‍ाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पसरणी येथील भैरवनाथनगर नावाच्या शिवारामध्ये बबन शिर्के यांच्या शेतात ऊसतोड चालू होती. बीड येथील ऊसतोड कामगारांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रक क्रं. (केऐ- 25- ऐ- 2164) शिवारातून बाहेर काढला जात होता. ट्रक चालक विठ्ठल राठोड व अन्य दोघेजण ट्रक मधून ऊस कराड येथील रयत कारखान्याकडे घेऊन निघाले होते. धोम डाव्या कालव्याच्या शेजारील रस्त्याने ऊसाने भरलेला ट्रक घेऊन जाताना मागील चाक घसरल्याने ट्रक एका बाजूला कलू लागला. ट्रक कलत असल्याची गोष्ट चालकाच्या लक्षात आल्याने त्याने त्वरित खाली उतरून स्थानिक तरुणांच्या मदतीने ट्रकला अनेक दोरी-रशी बांधून ट्रक पलटी होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

ऊसाने भरलेल्या ट्रक कालव्यात कोसळल्याने कालव्याचे पाणी तुंबले व शेजारील कालव्यात वाहू लागले. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले, मात्र कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. रात्री उशिरा पर्यंत क्रेनच्या सहाय्याने ट्रक कालव्यामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान धोम पाटबंधारे विभागाच्या वतीने तातडीने कालव्यातील पाणी बंद करण्यात आले होते.

Leave a Comment