शेतकऱ्यांमध्ये खळबळ : वाईत डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळे 36 हजार पशुधन धोक्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील सरकारी १२ आणी खाजगी ३२ जनावरांच्या डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आणी राज्य सरकारला वटणीवर आणण्यासाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्याने ११७ गावातील ३६ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बेमुदत पुकारलेल्या या संपाचे निवेदन वाई तालुका पशुवैदकीय डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. … Read more

शिवसेनेचा आमदार बैलाचा औत धरून भात शेतात लागणीत व्यस्त, सोशल मिडियावर व्हायरल

जावली | जावली तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सध्या काय करतात हा प्रश्न उत्सुकतेने विचारला जाऊ लागला आहे. कारण सध्या त्यांचा एक फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते शेतात बैलाचा औत धरलेले दिसत आहेत. तर जावलीचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ सध्या आपल्या चोरांबे या मुळ गावी पावसाने उघडीप दिली असल्यामुळे घरच्या शेतीमध्ये … Read more

जयवंत शुगर्सचा 2021- 2022 च्या गळीत हंगामासाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते रोलर पूजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात 2021- 2022 च्या गळीत हंगामासाठी ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, श्री. विनायक भोसले, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. … Read more

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली प्रतिनिधी : हिंगोली वसमत तालुक्यात जिल्हाभरात आज सकाळी अंदाजे 8-30 ते 8-36 या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळ सकाळी भुकंपाचे धक्के जाणवल्याने काही वेळासाठी नागरिकांत संभ्रमाचे वातावरण पसरले होते. आज गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा , इंजनगाव , म्हातारगाव, महागाव … Read more

शिरपेचात मानाचा तुरा : कृष्णा कारखान्याने GST नियमित भरणा केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सन्मान

Krishna Factry Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने  सन 2020-21 या आर्थिक वर्षात दि. 31 मार्च अखेर जी.एस.टी कर प्रणाली नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही केल्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला ‘सर्टिफिकेट ऑफ ॲप्रीसिएशन प्रमाणपत्र’  प्रदान करून सन्मान केला आहे. चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली … Read more

संबधितावर गुन्हा दाखल : शर्यतीच्या बैलाची हत्या नाही, अपघातात मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न

crime

सातारा | जावली तालुक्यातील सरताळे येथे एका शर्यतीच्या बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत होते. कारण या बैलाचे पाय मोडले होते. मात्र, या प्रकरणाच्या तपासात या बैलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा बैल पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावचा आहे. काही दिवसांपूर्वी सरताळे येथे एका बैलाचा मृतदेह … Read more

शर्यतीच्या बैलाची अमानुष हत्या : अज्ञाताकडून फास लावून कुऱ्हाडीचे घाव घातले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून क्रूरतेने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री घडला आहे. या घटनेची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून … Read more

औरंगाबादेतील शेतकऱ्यांचा शेतीमाल रेल्वेद्वारे होणार निर्यात; पहिली किसान रेल्वे कोलकत्त्याकडे रवाना

kisan train

औरंगाबाद |  येथून शनिवारी शेतकऱ्यांसाठी पहिली किसान रेल्वे धावली. शेतकऱ्याचा मालवाहतूक करणारी औरंगाबाद येथून ही पहिलीच रेल्वे असून 246 टन कांदा घेऊन ही रेल्वे कोलकत्ताकडे रवाना झाली. रेल्वेद्वारे शेतकऱ्यांचा शेतीमाल विविध ठिकाणी पोहोचत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत देशातील विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सुरू … Read more

पीक विम्यासाठी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

crop insurance

उस्मानाबाद | शेतकऱ्याच्या हक्काचे खरीप हंगाम 2020 पिक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी कृषी व महसूल मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर कृषी आयुक्तांनी तीन दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा नोटिसा विमा कंपन्यांना दिल्या. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही अखेर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार ज्ञानराज चौगुले … Read more

कृषी विभागाची मोठी कारवाई : विनापरवाना 21 लाखांचा खतांचा मुद्देमाल जप्त

सांगली | खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांना खते रास्त दरात व गुणवत्ता पूर्ण उपलब्ध करुन देण्याकरिता तसेच विक्रेत्यांनी या निविष्ठांची शेतकऱ्यांना जादा दराने खते विक्री करू नये. खतांचा काळाबाजार करू नये तथा भेसळ युक्त खते शेतकऱ्यांना विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने 11 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी सांगली येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल … Read more