शेतकऱ्यांनंतर व्यापारी मोदी सरकारविरोधात आक्रमक; राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद

नाशिक । मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वधारले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मनमाड-बाजार समितीत कांद्याचा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे. तर पिंपळगाव-बसवंतमध्येही व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव रद्द केले आहेत. मोदी सरकारने … Read more

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोडलं कंबरडं; आधी निर्यात बंदी आणि आता…

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष असताना आता कांदा आयात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना भारतात कांदा आयात करण्यासाठी केंद्रानं आमंत्रण दिलं आहे. जे देश कांदा उत्पादक आहेत तिथून भारतातल्या आयातीसाठी त्या-त्या दूतावासांना विशेष आदेश मोदी सरकारकडून देण्यात आले … Read more

‘शेतकऱ्यांचा कांदा परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा!’; बच्चू कडू कडाडले

अमरावती । मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर कांद्याचे भाव वधारले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत दर वाढले म्हणून बोंबलू नका, जर कांदा परवडत नसेल तर … Read more

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा – देवेंद्र फडणवीस

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा असं विधान फडणवीस यांनी केलेय. आत्ता … Read more

फक्त ‘या’ चुकीमुळं लाखो शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित; ४७ लाख शेतकर्‍यांची रक्कम रोखली

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेपासून लाखो शेतकरी वंचित असल्याचे समोर लं आहे. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत त्यांच्या खात्यावर वर्षाकाठी एकूण 6000 रुपये पाठवते. मात्र, काही चुकांमुळं (PM-Kisan Scheme) शासनाने आतापर्यंत या योजनेंतर्गत 47लाख 5 हजार 837 शेतकर्‍यांची रक्कम रोखली आहे. या शेतकर्‍यांच्या नोंदी संशयास्पद असून, आधार आणि … Read more

‘शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी यावेळी निकष बदल करणे गरजेचे’- शरद पवार

उस्मानाबाद । राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ”शेतीच्या नुकसानीची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागणार आहे,” अस मत शरद पवार यांनी दौऱ्यात व्यक्त केलं. “शेतकऱ्यांनी काढून ढीग केलेलं सोयाबीन वाहून गेले. त्यांना सुद्धा मदत करणे गरजेचे आहे, शेती वाहून जाणे, सध्या वाहून गेलेल्या पिकांना मदत … Read more

अस्मानी संकटाचा कहर! मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेती पाण्याखाली; शेतकरी हवालदिल

औरंगाबाद । कोरड्या दुष्काळामुळं गेली काही वर्ष होरपळून निघालेल्या मराठवाड्यावर आता ओल्या दुष्काळाने थैमान घातलं आहे. राज्यासह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने चांगलाचं झोडपलं आहे. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. या अस्मानी संकटामुळं हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून … Read more

पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

पुणे प्रतिनिधी | पुणे शहर आणि परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. Pune: Water … Read more

अतिवृष्टीनंतर आता कडाक्याची थंडी; हवामान खात्याचा अंदाज

Winter

नवी दिल्ली । यंदाचं वर्ष कोरोना महामारी, अतिवृष्टी यांनी गाजवलं असताना आता हिवाळ्यात थंडीही अधिक कडाक्याची राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. सप्टेंबर, ऑक्टॉबर महिन्यात उष्णता जाणवत असली तरी इथून पुढे थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदाचा हिवाळा हा यापूर्वीच्या हिवाळ्यांपेक्षा अधिक थंड असू शकतो. ‘नीना कंडिशन’ मुळे यावर्षी अधिक … Read more

शेतकरी विरोधानंतर सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांवरून मोदी सरकारला बजवली नोटीस

नवी दिल्ली । मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. शेतमालाला चांगला भाव देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेली एपीएमसी यंत्रणा नष्ट करेल, असं याचिकांमध्ये म्हटलं आहे. दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. केंद्रातील मोदी सरकारनं पावसाळी अधिवेशनात … Read more