प्रेयसीला 1 कोटी देऊ शकला नाही म्हणून 31 वर्षीय तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

0
46
ahmadabad crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये प्रेयसीला 1 कोटी रुपये देऊ न शकल्याने एका 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी तरुणाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण ?
मृत व्यक्तीचे नाव लखन मखिजा असे असून तो अहमदाबाद येथील नाना चिलोदा या ठिकाणचा रहिवाशी होता. मृत लखनच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, लखनच्या प्रेयसीने त्याच्याकडून तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. लखनच्या कुटुंबाचा चांगला व्यवसाय असला तरी ते इतकी मोठी रक्कम तिला देऊ शकत नव्हता. यानंतर लखनने आपल्या प्रेयसीला आपण एवढी रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगितले. यानंतर लखनच्या प्रेयसीने त्याच्याशी बोलणे थांबवले. या सगळ्यांचा लखनवर गंभीर परिणाम झाला. यानंतर लखनने टोकाचा निर्णय घेत आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र लखनच्या आत्महत्येला सहा दिवस उलटून गेले तरी अद्याप त्याच्या प्रेयसीविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

कुठे झाली तरुणीसोबत भेट
मॉर्निंग वॉकदरम्यान लखनची त्या तरुणीसोबत ओळख झाली. यानंतर दोघे एकमेकांना रोज भेटू लागले. यानंतर हळू हळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र त्या प्रेयसीच्या मनात वेगळेच सुरु होते. तिला कॅनडाला शिफ्ट व्हायचं होते. यासाठी तिला इन्व्हेस्टमेंट व्हिसा पाहिजे होता. मात्र तिच्याकडे इतके पैसे नव्हते म्हणून तिने लखनकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र लखनने पैसे देण्यास नकार दिला तर तिने लग्न करणार नसल्याचे लखनला सांगितले. तसेच तिने लखनशी बोलणेसुद्धा बंद केले. यानंतर लखनने घटनेच्या आदल्या दिवशी पैशांबाबत त्याच्या बाबांशी बोलणे केले. त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपण उद्या सकाळी बोलू असे सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी लखनच्या मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर लखनच्या आईने आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या तरुणीविरोधात तक्रार दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here