हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज 15 ऑगस्ट रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने संपूर्ण देशभरात साजरा होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक क्रांतिकारकांचा सिंहाचा वाटा आहे. अनेकांनी देशासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले आहे, तेव्हा कुठं आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. आज देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आज तकने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख व्यक्तींनी राष्ट्रगीत कसे गायले असेल याची कल्पना करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाष चंद्र बोस, सरोजिनी नायडू, बाबासाहेब आंबेडकर, चंद्रशेखर आझाद, रवींद्रनाथ टागोर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह स्वातंत्र्य चळवळीतील नेते दाखवण्यात आले आहेत. त्या काळात या सर्व स्वातंत्र्यवीरांनी जन गन मन हे आपलं राष्ट्रगीत कसं म्हंटल असेल यांचाच अनुभव आपल्याला येईल.
AI अतिशय छान पद्धतीने या सर्व स्वातंत्र्यवीरांचे चित्रण केलं असून व्हिडिओ पाहताच प्रत्येक भारतीय नागरिकाच्या अंगावर शहारे येतील. हा व्हिडीओ केवळ इतिहासाचे जतन करत नाही तर तो इतिहासाला पुन्हा एकदा जिवंतही करतो. या व्हिडिओ च्या माध्यमातून वरील सर्व दिग्गजांना जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळते. आणि चिरस्थायी वारसा त्यांच्यासोबत साजरा करण्याची संधी मिळते.