हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI म्हणजे अमेरिकन भारतीय असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हंटल, तसेच हेच AI संपूर्ण जगाची खरी पॉवर असल्याचे प्रतिपादन मोदींनी केलं. नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून न्यूयॉर्कमधील नासाऊ कोलिझियम येथे अनिवासी भारतीय समुदाय आणि भारतीयांना त्यांनी संबोधित केलं. ,
आपल्या भाषणात मोदी म्हणाले, मित्रांनो, जगासाठी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, पण माझा विश्वास आहे की एआय म्हणजे अमेरिकन-भारतीय… अमेरिका भारत, हा आत्मा आहे आणि ही नवीन जगाची AI शक्ती आहे. हा AI आत्मा भारत-अमेरिका संबंधांना नवीन उंची देत आहे. मी तुम्हा सर्वांना, भारतीय डायस्पोराला सलाम करतो. मोदींच्या या वाक्यानंतर संपूर्ण परिसरात मोदी- मोदी घोषवाक्य सुरु झालं. संपूर्ण वातावरण हे मोदीमय पाहायला मिळालं.
मोदी पुढे म्हणाले, भारताला आपले वर्चस्व नको आहे, तर जगाच्या भरभराटीसाठी भूमिका बजावायची आहे. आज भारताचे परराष्ट्र धोरण सर्वांशी समान अंतर राखण्याचे नसून समान जवळीकीचे आहे. “ही युद्धाची वेळ नाही” … जागतिक शांतता प्रक्रियेला गती देण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची असेल असेही मत मोदींनी मांडलं. दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात भारताने 150 हून अधिक देशांना दिलेल्या मदतीचा संदर्भ देत मोदी म्हणाले, “जगात जेव्हाही आपत्ती आली तेव्हा भारत प्रथम मदतीसाठी सर्वात आधी धावून आला. भूकंप असो किंवा गृहयुद्ध, भारत तिथे आधी पोहोचतो.
असे म्हटले जाते की त्याग करणाऱ्यांनाच आनंद मिळतो, इतरांचे भले करून आणि त्याग करून आनंद मिळतो, आपण कोणत्याही देशात राहिलो तरी ही भावना बदलत नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात आपले योगदान अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर, संशोधक, तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही येथे फडकवलेला ध्वज हे त्याचेच प्रतीक आहे, काही काळापूर्वी येथे T-20 क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. यूएसएचा संघ अप्रतिम खेळला, त्या संघात इथे राहणाऱ्या भारतीयांचे योगदान जगाने पाहिले असेही मोदींनी म्हंटल.