टीम हॅलो महाराष्ट्र । निवडणुकांच्या तोंडावर पैशांच्या मोबदल्यात मत विकण्याचा सल्ला देणारे महाभाग नेते नवीन नाहीत. त्यात ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी भर आहे. ओवेसी यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या मतदारांना पैसे देत असल्याचा आरोप करत म्हटले की, काँग्रेसवाल्यांकडे खूप पैसा आहे, तो घ्या आणि मला मतदान करा. तसेच, मी काँग्रेसवाल्यांना दर वाढवण्यास सांगतो. माझी किंमत केवळ दोन हजार नाही, त्यापेक्षाही जास्त आहे, असे देखील ओवेसींनी म्हटले आहे. असं जाहीर आवाहनच ओवेसींनी तेलंगणातील एका सभेत केलं.
तेलंगणमधील भैंसामध्ये दोन समुदायांमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरही ओवेसींनी भाष्य केलं. तसेच, ”मी मुख्यमंत्र्यांकडे या घटनेतील सर्व दोषींविरोधात कारवाईची मागणी करतो याचबरोबर, मी ही देखील मागणी करतो की ज्या लोकांचे यामध्ये नुकसान झाले आहे, त्यांना नुकसानभरपाई दिली जावी. तसेच मी भैंसा येथील नागरिकांना शांतता राखण्याचेही आवाहन करतो.” असे देखील ओवेसी म्हणाले आहेत
Asaduddin Owaisi, AIMIM: People in Congress have a lot of money, take it from them. You’ll be getting it due to me. Just vote for me. If they are giving you (money) then take it. I say to Congress to raise the rate, my price is not Rs 2000 only. I am worth more than that. (13.01) pic.twitter.com/nVZDomZRhO
— ANI (@ANI) January 14, 2020