हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून नाशिक विमानसेवेची चर्चा चांगलीच जोर धरतीये. विमानसेवेचा बदलेला टाइमटेबल आणि सुरु होणारी नवीन सेवा ह्याबाबत नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नाशिकहून आता देशातील तब्बल 13 प्रमुख शहरासाठी विमासेवा सुरु होणार आहे. कशी असेल याची वेळ जाणून घेऊयात.
29 ऑक्टोबरपासून सुरु होणार सेवा
13 शहरांना नाशिकशी जोडण्यासाठी येत्या 29 ऑक्टोबर पासून होपींग फ्लाईट ही सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिककर मनातून आनंद व्यक्त करत आहेत. हिवाळा आणि पर्यटन ह्या दोन्ही गोष्टी समोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ह्यामुळे नागरिकांच्या वेळेतही बचत होणार आहे.
कोणत्या शहरांचा असेल समावेश?
मागच्या काही महिन्यांपासून नाशिक विमानसेवेत गोधळ पाहायला मिळत होता. मात्र आता ही सुविधा अधिक चांगली करण्यात येणार असल्यामुळे नाशिककर सुखावले आहेत. आता 29 ऑक्टोबर पासून नाशिकमधून चंदीगड, भोपाळ, लखनऊ, श्रीनगर, जयपूर, अमृतसर, चेन्नई, जैसलमेर, कोची, कोलकाता, आग्रा, विजवाडा, वाराणसी अश्या प्रमुख 13 शहरांतुन ही हॉपिंग फ्लाईट विमानसेवा जाणार आहे. त्यासाठी वेळापत्रकही जारी करण्यात आले आहे.
कसे असेल वेळापत्रक?
नाशिक ते भोपाळ अशी होपिंग फ्लाईट ही अहमदाबादमार्गे सकाळी 11.05 ला असेल तर रात्री हीच फ्लाईट 7.45 ला असेल.
नाशिक – अमृतसर फ्लाईट गोवा मार्गे दुपारी 1 वाजता असेल तर रात्री ही फ्लाईट 11.30 वाजता असेल.
नाशिक-वाराणसी फ्लाईट अहमदाबादमार्गे सकाळी 11 वाजून 5 मिनिटाला असेल तर दुपारी 4.55 मिनिटांनी असेल.
नाशिक-जयपूर ही होपिंग फ्लाईट अहमदाबादमार्गे सकाळी 11.05 तर रात्री 8.25 ला असेल.
नाशिक-दिल्ली फ्लाईट नागपूरमार्गे 8.10 am ला असेल त्यानंतर ही फ्लाईट 1.35 pm वाजता असेल.
नाशिक-बेंगळरू फ्लाइट हैदराबाद मार्गे 7.25 pm ला असेल तर त्यानंतर ही फ्लाईट 10 pm ला असेल.
नाशिक-चेन्नई फ्लाईट गोवामार्गे 1pm ला असेल तर पुन्हा ही फ्लाईट 5.50 pm ला असेल.
नाशिक-कोलकता फ्लाईट हैदराबादमार्गे 5.25 pm ला तर पुन्हा 11 pm वाजता असेल.
नाशिक-भुवनेश्वर फ्लाईट हैदराबादमार्गे सायंकाळी 7.25 रात्री 10.50 असेल.
म्हणजे एकच दिवशी दोन वेळेस ह्या होपिंग फ्लाईट असल्यामुळे नाशिककरांना आपला वेळही वाचवता येईल. तसेच पर्यटणाचा आनंद मनसोक्त घेता येईल. हिवाळा संपल्यानंतर ह्या वेळापत्रकात पुनः बदल करण्यात आहेत. असे सांगण्यात येत आहे.
राजधानी दिल्लीचीही विस्तारणार विमानसेवा
देशाच्या इंडिगो कंपनीमार्फत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात हिवाळी सत्रासाठी 29 ऑक्टोबरपासून राजधानी दिल्लीसह उत्तर व दक्षिण तसेच पूर्व व पश्चिम भारतात विमानसेवा सुरु करण्यात आल्यामुळे त्याचा चांगलाच विस्तार होणार आहे.