व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

फक्त 50 हजार रुपयांत परदेश प्रवासाची संधी !!! IRCTC कडून स्वस्त हवाई टूर पॅकेज लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC  : कोरोना काळात लावण्यात आलेली आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी आता जवळजवळ पूर्णपणे हटवण्यात आली आहे. ज्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा भटकंतीला सुरूवात केली आहे. आता लोकं देशांतर्गत प्रवास बरोबरच आंतरराष्ट्रीय प्रवासाचेही प्लॅनिंग करू लागले आहेत. अशा परिस्थितीत, जर आपणही बाहेरच्या देशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमीसाठी आपल्यासाठी महत्वाची ठरू शकेल.

IRCTC users can now book 12 tickets a month from single ID, know the process

हे लक्षात घ्या कि, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने नुकतेच एक बजेट फ्रेंडली ऑफर लाँच केली आहे. म्हणजेच आता IRCTC कडून आंतरराष्ट्रीय टूरसाठी परवडणारी जागा शोधण्यात मदत मिळेल. जर आपल्यालाही या पॅकेजचा लाभ घ्यायचा असेल तर त्याविषयीची सर्व माहिती इथे जाणून घ्या.

IRCTC दे रहा थाईलैंड घूमने का मौका, बस खर्च करने होंगे इतने रुपये, जानिए डिटेल - irctc air tour package thailand delights ex guwahati bangkok pattaya starts at rs 49067 per person

नक्की काय ऑफर आहे???

IRCTC ने फक्त 49,067 रुपयांमध्ये थायलंडसाठीचे एक एअर टूर पॅकेज लाँच केले आहे. या पॅकेज अंतर्गत थायलंडमधील सर्व ठिकाणांना भेट देता येईल. यामध्ये एका व्यक्तीसाठी त्याची सुरुवातीची किंमत 49,067 रुपये ठेवण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये विमान तिकीटाशिवाय इतर सुविधांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

IRCTC दे रहा थाईलैंड घूमने का मौका, बस खर्च करने होंगे इतने रुपये, जानिए डिटेल - irctc air tour package thailand delights ex guwahati bangkok pattaya starts at rs 49067 per person

कोण-कोणत्या सुविधा मिळतील ???

या पॅकेजचे नाव थायलंड डिलाइट्स एक्स गुवाहाटी असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये गुवाहाटीची आंतरराष्ट्रीय सहल दिली जाईल. यामध्ये येण्या-जाण्यासाठीचे विमानाचे तिकीट, राहण्याची व्यवस्था, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश असेल. मात्र दुपारच्या जेवणाची व्यवस्था आपल्याला स्वतःला करावी लागेल. यामध्ये आपल्याला बुद्ध मंदिर, सफारी वर्ल्ड इत्यादी विविध ठिकाणे दाखविली जातील.

IRCTC Tour Package: विदेश घूमने का है मन? आईआरसीटीसी के इस पैकेज के साथ करें थाईलैंड की सैर| Zee Business Hindi

किती दिवसांची ट्रिप असेल ???

IRCTC चे हे पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रींसाठी आहे. ही सहल 13 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल आणि 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालेल. या पॅकेजमध्ये बँकॉक आणि पट्टायासारख्या ठिकाणांचाही समावेश आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/

हे पण वाचा :

Maruti Suzuki कडून गाड्यांवर मिळते आहे 50,000 रुपयांपर्यंत सूट !!!

FD Rates : अल्पावधीत FD वर 7.5% पर्यंत व्याज देणाऱ्या टॉप 10 बँकांची लिस्ट पहा

SBI MODS : खुशखबर !!! आता कोणत्याही दंडाशिवाय SBI च्या ‘या’ FD खात्यातून काढता येतील पैसे

गेल्या काही वर्षांत ‘या’ 2 Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचा भाव पहा