व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

FD Rates : अल्पावधीत FD वर 7.5% पर्यंत व्याज देणाऱ्या टॉप 10 बँकांची लिस्ट पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : सध्या अनेक बँकांनी आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. ही वाढ 6 महिने ते 3 वर्षे अशा अल्पकालीन कालावधीत झाली आहे. RBI कडून सलग तीन वेळा रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर बँकांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे लक्षात घ्या कि, स्मॉल फायनान्स बँका जास्त रिटर्न देण्यात आघाडीवर आहेत. यानंतर परदेशी बँका आणि नंतर खाजगी बँकांचा नंबर लागतो. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँका रिटर्न देण्यात खूप मागे आहेत. BankBazaar द्वारे गोळा केलेल्या डेटाच्या आधारे, 3 वर्षांसाठी टॉप 10 बँकांमधील FD वरील सरासरी रिटर्न 7.2 टक्के आहे.

RBI FD Rules 2022: Fixed deposit investors ALERT! New FD rule on interest rate to impact your investment - details | Zee Business

Fixed deposits द्वारे लिक्विडिटी बरोबरच नियमित अंतराने खात्रीशीर रिटर्न देखील मिळतात. यामध्ये पुरेशी लिक्विडिटी म्हणजे जेव्हा आपल्याला पैशांची गरज भासेल तेव्हा पैसे मिळतील. आज आपण 3 वर्षांच्या कालावधीसह FD वर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या टॉप 10 बँकांची माहिती जाणून घेउयात … FD Rates

स्मॉल फायनान्स बँकांकडून सर्वोत्तम व्याजदर दिला जातो आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या FD वर ग्राहकांना 7.5 टक्के व्याज दिला जातो. मात्र हा व्याजदर 1 लाख रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिटसाठी लागू असेल. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेतील गुंतवणुकीचा कालावधी 1,000 दिवसांचा आहे. त्याचप्रमाणे, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून दिलेले व्याजदर मिळवण्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी 525 दिवस आणि 990 दिवसांचा आहे. FD Rates

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

तसेच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 1 लाख रुपयांच्या एफडीवर 7.49 टक्के व्याज देते. याच्या गुंतवणुकीचा कालावधी 999 दिवसांचा असेल. त्याच बरोबर जन स्मॉल फायनान्स बँकेकडून 1 लाख रुपयांच्या एफडीवर 7.35 टक्के व्याज मिळत आहे. यामधील गुंतवणुकीचा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त मात्र पाच वर्षांपेक्षा कमी आहे. त्याच वेळी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 1 लाख रुपयांच्या एफडीवर 7.32 टक्के व्याज देत आहे. याच्या गुंतवणूक कालावधी 888 दिवस आहे. FD Rates

परदेशी बँकांबाबत बोलायचे झाल्यास ड्यूश बँकेकडून सर्वोत्तम व्याजदर दिला जात आहे. यामध्ये 1 लाख रुपयांच्या FD वर 7 टक्के व्याज मिळते. तसेच याच्या गुंतवणुकीचा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त मात्र चार वर्षांपेक्षा कमी आहे. आता बंधन बँक आणि RBL बँक या खाजगी बँकांमध्ये सर्वोत्तम व्याजदर देतात. या दोन्ही बँका 1 लाख रुपयांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देतात. यांच्या गुंतवणुकीचा कालावधी अनुक्रमे 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी आणि 15 महिन्यांचा आहे. FD Rates

Bank Fixed Deposit: Check latest interest rates for general customers, senior citizens

छोट्या खाजगी बँका आणि स्मॉल फायनान्स बँकांकडून नवीन डिपॉझिट्स वाढवण्यासाठी जास्त व्याजदर दिला जात आहे. यासाठी सेंट्रल बँकेची उपकंपनी असलेल्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सच्या गुंतवणुकीची हमी मिळते. इथे हे लक्षात घ्या कि, FD च्या व्याजावरील हा डेटा 2 सप्टेंबर 2022 पर्यंतचा आहे, बँकेच्या वेबसाइटवर दिलेला आहे. हा डेटा गोळा करताना, BankBazaar ने सुमारे 3 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक ऑफर केलेल्या व्याज दराचा विचार केला आहे. FD Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.bankbazaar.com/fixed-deposit-rate.html

हे पण वाचा :

SBI MODS : खुशखबर !!! आता कोणत्याही दंडाशिवाय SBI च्या ‘या’ FD खात्यातून काढता येतील पैसे

SBI मध्ये 5000 हुन अधिक जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचा भाव पहा

‘या’ Multibagger Stock मध्ये फक्त 15 हजार रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदार बनले करोडपती !!!

राहूल गांधीची “भारत जोडो नव्हे, भारत तोडो यात्रा” : रामदास आठवले