Airtel चा रिचार्ज प्लॅन उडवणार Jio ची झोप; OTT सह मिळतात ‘हे’ फायदे

Airtel Recharge Plan 599 rs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio आणि Airtel या दोन टेलीकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असून दोन्ही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नेहमीच दिसते. दोन्ही कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन आणि सेवा ग्राहकांना परवडणाऱ्या असतात. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये सातत्याने चुरस पाहायला मिळते. आता Airtel ने 599 रुपयांचा असा एक रिचार्ज प्लॅन आणला आहे ज्यामुळे Jio ची झोप उडू शकते. हा प्लॅन नेमका काय आहे आणि यामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेऊयात.

599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनचे उदाहरण घेतले तर एअरटेल आणि जिओ यांच्यात थोडासा फरक दिसतो. एअरटेल आणि जिओच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग व खूप डेटा दिला गेला आहे. OTT च्या बाबतीत बोलायचे म्हटले तर एअरटेलचा प्लॅन उजवा असल्याचे तुलनात्मकदृष्ट्या दिसून येते. जिओच्या प्लॅनमध्ये Jio TV आणि Jio Cinema चा फ्री अ‍ॅक्सेस दिला गेला आहे. एअरटेलच्या प्लॅनमध्ये Amazon Prime Video आणि Disney तसेच Hotstar वरील व्हिडीओ तुम्ही मोफत पाहू शकता. या प्लॅनच्या स्पर्धेमुळे ग्राहक खुश आहेत. परंतु एअरटेलने याबाबतीत ग्राहकांना जास्त खुश केल्याचे दिसत आहे. दोन्ही कंपन्यांचा 599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन नेमका काय आहे, ते आपण पाहू.

Airtel चा 599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

एअरटेलचा हा प्लॅन 1 रेग्युलर आणि 1 फॅमिली अॅड-ऑन सिमसह उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी 75 GB डेटा मिळणार आहे. अॅड-ऑन कनेक्शनला प्लॅनमध्ये 30GB डेटा मिळू शकतो. प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग देत आहे. जिओच्या प्लॅनप्रमाणे या प्लॅननुसार एअरटेलने प्रति दिवस 100 मोफत SMS देण्याची सुविधा दिली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या या प्लॅनमध्ये 6 महिन्यांसाठी Amazon Prime ची मेंबरशिप दिली आहे. याशिवाय, या प्लॅननुसार ग्राहकांना 1 वर्षासाठी Disney + Hotstar वर मोफत प्रवेश मिळण्याची संधीही उपलब्ध करून दिली आहे.

Jio चा 599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन –

Jio कंपनीचा हा पोस्टपेड प्लान सुद्धा ग्राहकांना आकर्षित करतो आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा देत ग्राहकांना इंटरनेट वापरण्याची संधी कंपनीने दिली आहे. जिओ कंपनीने पात्र ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा दिला आहे. या प्लॅनमध्ये फ्री अमर्याद कॉलिंग कंपनीने दिले आहे. प्रत्येक दिवशी 100 फ्री SMS दिले गेले आहेत. जिओने या प्लॅननुसार, ग्राहकांना Jio TV, Jio Cloud सोबत Jio Cinema मोफत पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.