Airtelचा Reliance Jioला दे धक्का! ठरलं देशातील पहिलं 5G रेडी नेटवर्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । ‘भारती एअरटेल’नं एका कमर्शिअल नेटवर्कवर लाईव्ह 5G इंटरनेट सेवेची यशस्वी चाचणी केली. अशी चाचणी करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली असून तिने रिलायन्स जिओला 5G सेवेच्या शर्यतीत पछाडलं आहे. एरटेलनं हैदराबादमध्ये कमर्शिअली 5G सेवा लाईव्ह केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी Airtel 5G रेडी नेटवर्कची घोषणा केली. 5G स्पेक्ट्रम अलॉटमेंटनंतर ट्रू 5G सेवा सुरू केली जाऊ शकते. तसंच कंपनीकडे 5G रेडी इकोसिस्टम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

एअरटेलने 1800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये एनएसए (नॉन स्टँड अलोन) नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमद्वारे ही सेवा लाईव्ह केली.
आपल्याच प्रकारच्या डायनॅमिक स्पेक्ट्रम शेअरिंगचा वापर करत एअरटेलनं त्याच स्पेक्ट्रम ब्लॉकमध्ये 5G आणि 4G ची सेवा एकत्रितरित्या सुरू केली. दरम्यान, 5G सेवा रेडिओ, कोअर आणि ट्रान्सपोर्ट या सर्व डोमेनसाठी कम्पॅटिबल असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

कमर्शिअलची चाचणी करणारं आपलं पहिलं नेटवर्क आहे, असा दावा एअरटेलनं केला आहे. कंपनीची 5G ची सेवा ही 4G च्या तुलनेत १० टक्के अधिक वेगवान असणार आहे. कंपनीनं याची हैदराबादमध्ये चाचणी घेतली आहे. हैदराबादमधील माधवपूर येथे कंपनी आपल्या 5G सेवेचा डेमोही देत आहे. युझरना या ठिकाणी ही सेवा किती वेगवान आहे हे पाहता येणार आहे. याशिवाय एअरटेल 5G नेटवर्कवर पूर्ण मुव्ही अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड केली जाऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच 5G सेवेमध्ये 3Gbps पर्यंतचा स्पीड मिळू शकतो. कंपनी स्पेक्ट्रमच्या लिलावांतर 5G सेवा त्वरित सुरू करण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.