हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. मार्केटमध्ये एअरटेलकडून जिओला सतत आव्हान दिले जात असते. Airtel ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या प्रीपेड टॅरिफ प्लॅनमध्ये बदल करत आहेत. ज्यामध्ये 31 दिवसांसाठी भरपूर डेटा आणि जास्त सोयी असलेल्या अनेक प्लॅन्सचा समावेश आहे. जर आपणही Airtel च्या एखाद्या चांगल्या प्लॅनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. या बातमीमध्ये आज आपण एअरटेलच्या 31 दिवसांची व्हॅलिडिटी आणि जास्त सुविधा असणाऱ्या प्लॅनबाबतची माहिती जाणून घेउयात…
319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Airtel च्या 319 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि डेली 100 SMS दिले जातात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 31 दिवसांची असेल. तसेच या प्लॅनमध्ये Apollo 24/7 Circle, Wink Music आणि Free HelloTune देखील मिळत आहेत. जर आपण जास्त डेटा वापरत असाल आणि फ्री म्युझिकचा आनंद घ्यायचा असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. या प्लॅनमध्ये Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.
296 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Airtel च्या 296 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 25 GB डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये डेली100 एसएमएस आणि 30 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल्स देखील दिले जातील. या प्लनमध्ये Apollo 24/7 Circle, Wink Music आणि Free HelloTune देखील मिळतील.
109 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या लिस्ट मधील Airtel चा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या 109 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 एमबी डेटा मिळेल. तसेच 99 रुपयांचा टॉक टाईम देखील मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची असेल. याशिवाय यामध्ये 2.5 पैसे प्रति मिनिट दराने लोकल आणि एसटीडी कॉलही करता येतील.
111 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Airtel च्या 111 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये 200 एमबी डेटा, 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 31 दिवसांच्या पूर्ण व्हॅलिडिटीसह 2.5 पैसे प्रति मिनिट लोकल आणि एसटीडी कॉल देखील मिळतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.airtel.in/recharge-online
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गेल्या 5 वर्षात दिला 700% रिटर्न !!!
Bank of Maharashtra च्या ग्राहकांना आता स्वस्त दरात मिळणार कर्ज !!!
QR Code म्हणजे काय ??? अशा प्रकारे जाणून घ्या
Home Loan वर किती टॉप अप लोन मिळवता येईल ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या