हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel आणि Jio च्या ग्राहकांसाठी वाईट बातमी आहे. कंपन्या लवकरच आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ करणार असल्याची चर्चा सुरु आहे . त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या खिशाला आणखी चाप बसण्याची शक्यता आहे. चला आज आपण जाणून घेऊया Airtel आणि Jio च्या रिचार्ज प्लॅन मध्ये नेमकी किती वाढ होऊ शकते आणि कधीपासून हे रिचार्ज महाग होणार आहेत याबाबत…
Jio आणि Airtel च्या प्लान्समध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात. म्हणजेच जर 300 रुपयांचा प्लान असेल तर त्याची नवीन किंमत 3३0 रुपये असेल. आणि 200 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनची किंमत 220 रुपये होऊ शकते . कंपनी कोणकोणत्या प्लॅन्सची किंमत वाढवणार आहे याबद्दल कोणतीही माहिती अजून तरी समोर आलेली नाही .
कधीपासून वाढू शकतात रिचार्जच्या किमती ?
2023 च्या शेवटच्या तिमाहीपर्यंत, Airtel आणि Jio आपले नवीन रिचार्ज प्लॅन आणण्याची शक्यता आहे. म्हणजे डिसेंबर ते जानेवारी दरम्यान जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन महाग होऊ शकतात. Airtel आणि Jio नंतर, व्होडाफोन आणि इतर टेलिकॉम कंपन्या सुद्धा त्यांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इथून पुढच्या काळात मोबाईल वापरणे परवडणारे नसेल.