Airtel Recharge Plan : Airtel चा परवडणारा रिचार्ज प्लॅन; दिवसाला फक्त 5 रुपये खर्च

Airtel Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Airtel Recharge Plan । सध्या वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. मोबाईलधारकांना आकर्षक रिचार्ज प्लॅन देण्यात अनेक टेलिकॉम कंपन्या पुढे येत आहेत. कोण स्वस्त दरात रिचार्ज प्लॅन देणार याकडे ग्राहकांचे नेहमीच लक्ष लागलेले असते. बाजारात Jio, Airtel, Vi या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी स्वस्तात मस्त ऑफर घेऊन येत असतात. तयच पार्श्वभूमीवर आता Airtel ने जे कमी इंटरनेट वापरतात, अशा ग्राहकांना घरबसल्या परवडणारा, स्वस्त आणि आकर्षक ऑफर आणली आहे, जिचे घरोघरी स्वागत होत आहे. एअरटेल टेलिकॉम कंपनीची नेमकी काय ऑफर आहे, हे आज आपण पाहणार आहोत.

एअरटेल टेलिकॉम ही कंपनी भारतातील मोठी कंपनी आहे. काळाच्या ओघात या कंपनीने त्यांच्या ग्राहकांना अनेक सोयी देत योग्य दरात रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge Plan)उपलब्ध केले आहेत. एअरटेल टेलिकॉमचे नेटवर्क योग्य रीतीने काम करते. त्यामुळे त्यांचे करोडो ग्राहक भारतभर आहेत. जर तुम्ही Airtel टेलिकॉम कंपनीचे ग्राहक आहात तर तुमच्यासाठी एक वर्षाचा स्वस्त रिचार्ज प्लॅन कंपनी बाजारात घेऊन आली आहे. ही ऑफर स्वस्त आणि किंमतीला परवडणारी दीर्घ मुदतीची म्हणजे 1 वर्षासाठी आहे.

दिवसाला फक्त 5 रुपये खर्च – Airtel Recharge Plan

दर दिवसाला फक्त 5 रुपये एवढा चार्ज घेऊन वर्षभराचा रिचार्ज प्लॅन एअरटेल कंपनी देणार आहे. हा कंपनीकडून ग्राहकांसाठी कमी बजेटचा प्लॅन आहे. एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन वार्षिक असून 1799 रुपये या प्लॅनचे मूल्य आहे. या प्लॅनमध्ये 24 GB इंटरनेट डेटा ग्राहकांना कंपनी देणार आहे. यात 3600 एसएमएस SMS मोफत दिले आहेत. अनलिमिटेड कॉल असल्याने ज्यांना कमी इंटरनेटची गरज आहे, अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन परवडणारा आहे. घरातील अनेक सदस्य मोबाईलचा वापर नातेवाईकांना कॉल करण्यासाठी करतात. काही वेळा महागडा रिचार्ज करूनही मोबाईलमधील दिवसभराचा इंटरनेट डेटा सर्वजण संपवू शकत नाहीत. अनेक वेळा विनाकारण रिचार्ज केला असे वाटते. त्या ग्राहकांना ही ऑफर म्हणजे दिलासा आहे.

दर महिन्याला 150 रुपयांपेक्षा कमी हा रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge Plan) असून या किंमतीत वर्षभर मोफत कॉलिंग करू शकता, माफक इंटरनेट वापरू शकता. तुमचा इंटरनेट डेटा ऐनवेळी संपल्यास डेटा बूस्टर प्लाननुसार रिचार्ज करता येते.या प्लॅनमध्ये लाईक फ्री हॅलो ट्यून्स विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्श, फास्ट ट्रॅक रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक अशीही सोय या प्लॅनमध्ये दिली गेली आहे.